पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज मनू भाकर मिळवू शकते दुसरे पदक! जाणून घ्या भारतीय खेळाडूंच्या सामन्यांची वेळ
मुंबई - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज चौथ्या दिवशी भारताची स्टार नेमबाज मनू भाकरकडून दुसऱ्या पदकाची भारताला आशा आहे, तर दुसरीकडे भारतीय खेळाडूंच्या आज सामन्यांच्या वेळा काय आणि कुणासोबत सामना आहे हे जाणून घेऊया.
नेमबाजीत मिळू शकते पदक
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू आज पदक जिंकण्याच्या इराद्याने खेळतील. नेमबाजीत भारतीय खेळाडू पदक आणू शकतात. मिश्र 10 मीटर पिस्तुल स्पर्धेत मनू भाकर आणि सरबजोत यांच्याकडून पदकाची आशा आहे. दोघांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

मुष्टीयुद्ध आणि बॅडमिंटनमध्येही भारताचे महत्त्वाचे सामने
अमित पंघाल बॉक्सिंगमध्ये आपला सामना आज खेळणार आहे. पंघलचा सामना सोळाव्या फेरीत आहे. पुरुषांच्या बॅडमिंटनमध्ये सात्विक आणि चिराग ही जोडी विजयाची दावेदार आहे.मुष्टीयुद्ध आणि बॅडमिंटनमध्येही भारताचे महत्त्वाचे सामने
पॅरिस ऑलिम्पिक भारताचे वेळापत्रक
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज कोणाचा सामना होणार?
मनू भाकर आणि हॉकीसाठीही आज एक महत्त्वाचा दिवस आहे. 'ब' गटात भारतीय हॉकी संघाचा सामना आयर्लंडशी होणार आहे. आयरिश संघाने ऑस्ट्रेलियाशी स्पर्धा केली होती. भारतीय संघही काही कमी नाही.
आजच्या स्पर्धेचे वेळापत्रक
शूटिंग
- 10 मीटर एअर पिस्तूल मिश्रित अंतिम स्पर्धा, मनू भाकर आणि सरबजोत - दुपारी 1 वाजता
- पुरुष ट्रॅप इव्हेंट, पृथ्वीराज तोंडैमन - दुपारी 12:30 (अंतिम - सायंकाळी 7 वाजता)
- महिला ट्रॅप इव्हेंट, श्रेयांसी सिंग - दुपारी 12:30 वाजता
बॉक्सिंग
- पुरुष बॉक्सिंग फेरी राऊंड 16 अमित पंघाल - 7:00 वाजता
- महिला बॉक्सिंग राऊंड 32 , जास्मिन - 9:08 वाजता महिला बॉक्सिंग, 16 , प्रीती पवार - रात्री 1 :22 वाजता
बॅटमिंटन
- पुरुष डबल्स, सात्विक आणि चिराग -सायंकाळी 5.30 वाजता
आर्चरी
- पुरुष वैयक्तिक स्पर्धा राऊंड 64, धीरज - रात्री 9.15 वाजता
- महिला वैयक्तिक राऊंड 64, भजन कौर 5.14 वाजता
- महिला वैयक्तिक राऊंड 64, अंकिता - 5.27 वाजता
हाॅकी
- भारत विरुद्ध आर्यलँड गट 'ब' - 4.45 वाजता












Click it and Unblock the Notifications