रमिता साधणार 'सुवर्ण'नेम, हाॅकीत मिळणार दमदार विजय! वाचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताचे कुणाशी सामने
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये दुसऱ्या दिवशी भारताला पहिले पदक जिंकण्यात यश आले. भारताची कन्या मनू भाकर हिने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. आता स्पुर्धेच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी (29 जुलै) ऑलिम्पिक पदक भारतीयखेळाडू नेमबाजी, बॅडमिंटन, हॉकी आणि तिरंदाजीमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
आज भारताला पदकाची अपेक्षा असून कुणा-कुणाचे आज सामने आहेत हे आपण आज पाहणार आहोत. आज रमिता जिंदालकडून भारताला शुटींगमध्ये पदक अपेक्षित आहे.

बॅटमिंटनमध्ये आज 'लक्ष्य'
पहिल्या बॅडमिंटन सामन्यात सोमवारी दुपारी 12 वाजता पुरुष दुहेरी बॅडमिंटनमध्ये सात्विकसर रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना जर्मनीच्या लॅम्सफस मार्क आणि सेडेल मारविन यांच्याशी होईल. दुपारी 12.50 वाजता महिला दुहेरीत
तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा यांचा सामना जपानच्या नामी मात्सुयामा आणि चिहारू शिदा यांच्याशी होईल.या सामन्याची वेळ बदलू शकते.
शूटिंग इव्हेंटवर लक्ष
- 12:45 वाजता सुरू होणाऱ्या 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दोन भारतीय संघ स्पर्धा करतील.
- मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी पहिला संघ तयार केला, तर रिदम संगवान आणि अर्जुन सिंग चीमा यांनी दुसरा संघ तयार केला. पृथ्वीराज तोंडैमन दुपारी 1 वाजल्यापासून ट्रॅप मॅन स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेत सहभागी होईल.
- रमिता जिंदाल दुपारी 1 वाजता सुरू होणाऱ्या 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत पदकासाठी स्पर्धा करेल.
हॉकी आणि तिरंदाजीत अपेक्षा
भारतीय पुरुष हॉकी संघ दुपारी 4:15 वाजता अर्जेंटिनाचा सामना करेल. हाॅकीत विजयाची अपेक्षा असून हाॅकीच्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 3-2 असा रोमांचक विजय मिळवला. धीरज बोम्मादेवरा, प्रवीण जाधव आणि तरुणदीप रॉय यांचा पुरुष तिरंदाजी संघ सायंकाळी 5:45 वाजता उपांत्यपूर्व फेरीत खेळेल.
टेबल टेनिस
महिला एकेरी टेबल टेनिस सामना भारताच्या श्रीजा अकुलाचा झेंग जियान हिच्याशी रात्री 11:30 वाजता होईल. अकुलाने यापूर्वी स्वीडनच्या क्रिस्टीना कलबर्गचा सरळ गेममध्ये 11-4, 11-9, 11-7 आणि 11-8 असा पराभव केला होता. पुरुष एकेरीच्या बॅडमिंटनमध्ये भारताच्या लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या ज्युलियन कॅरेजशी संध्याकाळी 5:30 वाजता होईल. सेनने आपला पहिला सामना ग्वाटेमालाच्या कॉर्डन केविनविरुद्ध सरळ गेममध्ये जिंकला.
आज सर्व सामने महत्वाचे
भारताचे आजचे सर्व सामने महत्वाचे आहे, यातून किमान दोन पदकं प्राप्त होऊ शकतात. त्यात शुटींगमध्ये रमिता जिंदाल मेडल मिळवून देऊ शकते, त्याशिवाय आणखी एक मेडल शुटींगमधून येऊ शकते असा एक्स्पर्टचा अंदाज आहे.












Click it and Unblock the Notifications