ऑलम्पिकमध्ये रमिता जिंदालकडून निराशा! पदक मिळवण्यात अपयशी, 8 स्पर्धकात मिळवले सातवे स्थान
भारताची स्टार निशानेबाज रमिता जिंदाल ही पदक प्राप्त करण्यात यशस्वी ठरली नाही. ती आठव्या स्थानावर राहीली.
महिला नेमबाज रमिता जिंदाल 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत आव्हानात्मक होती. रविवारी मनू भाकेरने भारताचे पदकाचे खाते उघडले होते आणि रमिता देशाला दुसरे पदक मिळवून देईल अशी अपेक्षा होती, पण आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत सातवे स्थानावर ती राहीली.

रमिताच्या पदकाच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच तिने सपशेल निराशा केली. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रमिताने सातवे स्थान पटकावले आणि तिचे पदक हुकले. रमिताने चांगली सुरुवात केली होती, पण दुसऱ्या मालिकेत ती मागे पडली आणि त्यानंतर तिला पुनरागमन करता आले नाही.
रमिताने 10.2 च्या शॉटने सुरुवात केली होती ज्यामुळे ती संयुक्त पाचव्या स्थानावर होती आणि एलिमिनेशनच्या 0.2 गुणांनी पुढे होती. यानंतर तिने पुन्हा 10.2 चा शॉट खेळला ज्यामुळे रमिता संयुक्तपणे सहाव्या स्थानावर घसरली. त्यानंतर रमिताने शूटऑफमध्ये 10.5 गुण मिळवले, परंतु रमिताचा प्रतिस्पर्धी मुलरने 10.8 गुण मिळवून स्पर्धेत स्वत:ला कायम राखले. अशाप्रकारे रमिताचा प्रवास सातव्या स्थानावर संपला.
सोमवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर भारतीय संघ एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदकाचा सामना खेळणार आहे. या स्पर्धेत मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचा संघ तिसरा राहिला. आता त्याचा सामना चौथ्या क्रमांकावर असलेल्या कोरियाशी होणार आहे.
आज, सोमवारी भारत नेमबाजी, बॅडमिंटन, हॉकी आणि तिरंदाजीमध्ये आव्हान सादर करणार आहे. भारतीय खेळाडूंची नजर ३ पदक स्पर्धांवर असेल.
आमचे खेळाडू 2 स्पर्धा पदकांमध्ये सहभागी होतील. नेमबाजीच्या 10 मीटर एअर रायफल महिला आणि पुरुषांच्या अंतिम फेरीत रमिता रमिता दुपारी 1 वाजता पदकासाठी आणि अर्जुन बाबुता दुपारी 3:30 वाजता पदकाचे लक्ष्य करेल. भारतीय तिरंदाजी संघ उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामनाही सायंकाळी होणार आहे.












Click it and Unblock the Notifications