Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू निरज चोप्रा सुवर्ण जिंकू शकतो का? जाणून घ्या कसा करतोय सराव

Neeraj Chopra Match: टोकियो ऑलिम्पिकप्रमाणेच यावेळीही भालाफेकमध्ये नीरज चोप्रा भारतासाठी सुवर्णपदक मिळवणं अपेक्षित आहे. गेल्या वेळी सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा यावेळीही सुवर्णपदकासाठी भाला फेकणार आहे. अंतिम सामन्यापूर्वी त्यांना पात्रता फेरीत खेळायचे आहे. हा सामना जिंकल्यानंतर त्यांना अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळणार आहे.

पात्रता फेरी सहा ऑगस्टला

पात्रता फेरी सहा ऑगस्टला होणार असून यानंतर 8 ऑगस्टला अंतिम सामना होणार आहे. टोकिओ ऑलिम्पिकमध्ये 4 ऑगस्ट रोजी जपानच्या नॅशनल स्टेडियमवर अंतिम सामन्यापूर्वी नीरज यानं पात्रता फेरीत भाला फेकला होता.

Paris Olympics 2024 Neeraj Chopra match sheduld day and time Latest Marathi News

पहिल्याच प्रयत्नात त्याने पुढच्या फेरीत जागा निश्चित केली होती. यावेळीही तो फायनलसाठी पात्र होताना दिसत आहे. त्यावेळी त्याने 86.65 मीटर अंतर कापून अंतिम फेरी गाठली होती.

कोणत्या खेळाडूंकडून मोठे आव्हान

अंतिम फेरीत गेल्यानंतर नीरजला काही खेळाडूंचे आव्हान असणार आहे. अव्वल दावेदारांमध्ये झेक प्रजासत्ताकचा जाकुब वडलेचं असेल. ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स, पाकिस्तानचा अर्शद नदीम, केनियाचा ज्युलियस येगो, त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट आणि फिनलंडचा ऑलिव्हर हेलँडर ही नावेही प्रबळ आहेत.

आकडेवारी काय सांगते?

चेक रिपब्लिकच्या जेकब वडलेजने गेल्या वर्षी डायमंड लीगमध्ये नीरजचा पराभव केला होता, पण टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 90.88 मीटर आहे. अँडरसन पीटरने नीरजला वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पराभूत केलं ही स्पर्धा 2022 मध्ये झाली होती. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 93.07 मीटर आहे.

भारत पाकिस्तान येथेही सामना!

नीरजसमोर इतर खेळाडूंची कामगिरी तितकीशी प्रभावी ठरली नाही. पण इथेही अर्थात या ऑलिम्पिकमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा होणार आहे. नीरज आणि नदीम यांच्यातील सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा असेल. नदीमने 90.12 मीटर अंतरावर भालाफेक केली आहे, नीरजची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 89.94 मीटर आहे.

नीरजची तयारी कशी होती

जर्मनीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर नीरजने तुर्कियेमध्येही सराव केला. 28 जुलैपर्यंत तेथे राहिल्यानंतर नीरज चोप्रा पॅरिसला पोहोचला. दुखापतीपासून वाचण्यासाठी नीरजने ऑलिम्पिक डायमंड लीगही सोडली होती. सरावासाठी त्याने हा निर्णय घेतला.

नीरज सुवर्णपदक जिंकेल का?

खेळात काहीही शक्य आहे. अनेक वेळा मानंकन नसलेले खेळाडूही पदक जिंकून खळबळ माजवतात. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असलेल्या खेळाडूला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिकमधील पदक स्पर्धेदरम्यान येणारे दडपण सहन करण्याचा अनुभवही नीरजला आहे. तो भारताला दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळवून देऊ शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+