ऑलिम्पिक इतिहासात 'या' खेळाडूने जिंकली आहेत 23 सुवर्णपदके, 800 कोटींहून अधिक आहे संपत्ती
Paris Olympics 2024 michael phelps: जगातील सर्वात जुनी स्पर्धा म्हणून ऑलिंम्पिक ची ओळख आहे. यंदा ऑलिंपिक साठी पॅरिसमध्ये भव्यदिव्य आयोजन केले जात आहे.पॅरिस ऑलिंपिंक 2024 ही स्पर्धा 26 जुलैपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा म्हणजे जगभरातील करोडो क्रीडा प्रेमींसाठी एक उत्सवच असतो. या खेळाची आतुरतेने वाट पाहत असतात.ऑलिंपिक स्पर्धा म्हटलं की नाव समोर येते ते म्हणजे 'मायकेल फेल्प्स' ऑलिंम्पिक खेळातील यशस्वी खेळाडू म्हणून 'मायकेल फेल्प्स' याची ओळख आहे.

मायकेलने जिंकले 23 सुवर्णपदकांसह एकूण 28 पदके
मायकल फेल्प्स ऑलिम्पिक क्षेत्रातील सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. मायकेल हे अमेरिकेचे माजी जलतरणपटू आहे.त्याने आतापर्यंत एकूण 23 सुवर्णपदकांसह 28 पदके जिंकले आहेत. मायकेल ने 2008 मध्ये बीजिंग ऑलिंपिक खेळामध्ये आठ सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा त्याने अमेरिकन जलतरणपटू मार्क स्पीटझ चा 1972 चा ऑलिम्पिक खेळात सात वेळा प्रथम क्रमांकाचा विक्रम मोडला होता. म्हणूनच 2008 मध्ये मायकेल ला जागतिक जलतरणपटू हा पुरस्कार देखील मिळाला होता. सर्वाधिक ऑलम्पिक पदके जिंकण्याचा विक्रम देखील मायकेल फेल्प्सच्याच नावावर आहे. तो विक्रम आतापर्यंत कोणीही मोडलेला नाही.
मायकेलच्या यशात त्याच्या आईचा मोठा वाटा
मायकेलच्या यशामध्ये त्याच्या आईचा मोठा वाटा आहे. लहानपणापासूनच त्याच्या आईने त्याला पोहणे शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. त्यामध्ये मायकेल फेल्प्स ने देखील मेहनत केली आणि यशाचे शिखर गाठले.
मायकेल फेल्प्स सर्वात श्रीमंत असून 800 कोटी पेक्षा जास्त त्याची संपत्ती आहे अशी माहिती रिपोर्टनुसार मिळाली आहे.












Click it and Unblock the Notifications