भारताच्या 'या' एकमेव खेळाडूकडून रोईंगमध्ये पदकाच्या आशा उंचावल्या
paris olympics 2024 : पॅरिसमधील ऑलिंपिकच्या स्पर्धेचे नेत्रदीपक आणि अभूतपूर्व उद्घाटन सोहळ्यानंतर आता 27 जुलैपासून पदकांच्या मोठ्या स्पर्धांना सुरुवात झाली आहे. प्रत्येक खेळाडू पदकाच्या आशेने मैदानात उतरत आहे. दरम्यान, रोव्हर बलराज पनवारने शनिवारी भारताच्या खेळात चांगली सुरुवात केली.
बलराज पनवार याने चौथा क्रमांक पटकावला
भारताच्या बलराज पनवारने पुरुष कल च्या हिट मध्ये 7 मिनिटे 7.11 सेकंदाची नोंद करत रोइंग स्पर्धेत चौथे स्थान पटकावले पण त्याला उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवता आला नाही, इजिप्तच्या अब्देलखालेक एलबानिया ( 7:05.06) हा तिसरा आल्याने बलराची संधी थोडक्यात हुकली.

मात्र आता त्याला उद्या 28 जुलै रोजी होणाऱ्या रेपेजच्या राऊंड मधून आगेकूच करण्याची आणखी एक संधी आहे.रेपेजचे नियम थोड्या फरकाने पात्रता मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी झालेल्या खेळाडूंना पुढील फेरीत जाण्याची परवानगी देतो. एक प्रकारे ही वाइल्ड कार्ड एंट्री समजू शकते.
बलराज ने चार वर्षांपूर्वीच रोईंगला सुरुवात केली आणि पॅरिसमध्ये सहभागी होणारा तो एकमेव भारतीय रोईंग पटू आहे. आशियाई स्पर्धेत थोडक्यासाठी त्याचे कांस्यपदक हुकले होते आणि या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या आशियाई व ओशियानीक रोइंग ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत कास्यपदक जिंकून त्याने पॅरिसचे तिकीट पटकावले होते.
25 वर्षीय बलराज सैन्य दलात कार्यरत आहे. तो हरियाणाच्या कैमला येथून आहे, त्याला बजरंग लाल ठक्कर हे मार्गदर्शन करतात. 2008 मध्ये त्यांनी याच क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.












Click it and Unblock the Notifications