शिवरायांच्या राज्यात माझा जन्म झाला याचा मला खूप अभिमान- ऑलिम्पिकवीर स्वप्निलची पुण्यात जंगी मिरवणूक
"माझा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात माझा जन्म झाला त्यामुळे मी खूप अभिमान आहे, एवढ्या वर्षानंतर मला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालं ही देशासाठी आणि राज्यासाठी मोठी गोष्ट आहे अशा भावना नेमबाजीत भारताला कास्यपदक मिळवून देणारा पॅरिस ऑलिम्पिकवीर स्वप्निव कुसाळे याने व्यक्त केल्या. तो आज पुण्यात एनआय वृत्तसंस्थेशी बोलत होता.
ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कास्यपदक मिळवून देणारा भारतीय नेमबाज स्वप्निल कुसाळे याचं काल मायदेशी भारतात आगमन झालं आहे. दिल्ली विमानतळावर त्याचं कालच जोरदार स्वागत करण्यात आलं. यानंतर तो आज पुण्यात पोहचला. येथेही त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं.

स्वप्निलनं ज्यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकल. त्याचवेळी त्याच्या गावात कोल्हापुरातील कांबळवाडीत दिवाळी साजरी झाली होती. महाराष्ट्र सरकारने स्वप्निलला एक कोटी रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं आहे.
50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कास्यपदक प्राप्त
स्वप्नील कुसाळेनं पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीत त्याने 590 गुण मिळवले आणि सातवे स्थान पटकावले. त्यानंतर त्यानं अंतीम फेरीत तिसरे स्थान पटकावत देशाला कास्यपदक मिळवून दिलं आहे.
#WATCH महाराष्ट्र: ओलंपिक पदक विजेता स्वप्निल कुसाले ने पुणे में विजय रोड शो किया।
— ANI_HindiNews (@AHindinews) August 8, 2024
उन्होंने #ParisOlympics2024 में पुरुष 50 मीटर राइफल स्पर्धा में कांस्य पदक जीता है। pic.twitter.com/nJrd6cXJh7
काय म्हणाला स्वप्निल कुसाळे?
स्वप्निल कुसाळे म्हणाला, माझा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात माझा जन्म झाला त्यामुळे मी खूप अभिमान वाटत आहे. एवढ्या वर्षानंतर मला मला देशासाठी आणि राज्यासाठी मेडल प्राप्त करण्याची संधी मिळाली. एवढ्या मोठ्या स्तरावर स्पर्धेत सहभाग करणे मोठी गोष्ट आहे.
देवाचं दर्शन घेणं महत्वाचं वाटतं
स्वप्निल कुसाळे म्हणाला, मी पुण्यात आल्यानंतर देवाचे दर्शन घेतो. त्यात भावना जोडलेल्या असतात. देवाचे दर्शन घेणं मला महत्वाचं वाटतं. मी एक खेळाडू आहे मला माहीत आहे की, आम्ही कोणत्या काळातील आणि प्रसंगातून जातो.
कोल्हापुरच्या राधानगरीत जन्म
स्वप्नील कुसळे हा महाराष्ट्रातील भारतीय नेमबाज आहे. त्यांचा जन्म 1995 मध्ये शेतकरी कुटुंबात झाला. 2009 मध्ये, त्यांच्या वडिलांनी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत त्याला दाखल केले. एक वर्षाच्या कठोर शारीरिक प्रशिक्षणानंतर, स्वप्निल कुसळेला एक खेळ निवडावा लागला आणि त्याने नेमबाजीची निवड केली.
स्वप्निलचे नेमबाजीवर अतिशय प्रेम आहे, त्याने आतापर्यंत यासाठी प्रचंड मेहनत घेतली. स्वप्निलला खेळातून विश्रांती मिळाल्यावत तो जेव्हा जेव्हा घरी येतो, तेव्हा तो घरच्याच जेवणाला प्राधान्य देतो. बाहेरचे खाणे टाळतो. सकाळी नाश्त्याला त्याला तांदळाची भाकरी आणि मेथीची भाजी खायला आवडते, असेही त्याच्या वडिलांनी एका दैनिकाशी बोलताना सांगितले.












Click it and Unblock the Notifications