क्रिकेट टीमला स्पेशल विमान! ऑलिम्पिक पदक विजेत्या हाॅकीपटूंचा इकॉनॉमी क्लासने प्रवास..हा भेदभाव का?
मुंबई - भारतीय क्रिकेट संघ बार्बाडोसमध्ये अडकल्यावर सरकारने त्यांच्यासाठी खास विमान पाठवले होते, पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळवणाऱ्या खेळाडू मात्र पॅरिसहून विमानाने येताना इकॉनॉमी क्लासने प्रवास करताना दिसले. क्रिकेटरसाठी पायघड्या अन् ऑलिम्पिक पदक विजेत्यांना कवडीची किंमत नाही का.. असा भेदभाव का असे प्रश्न आता विचारले जात आहेत.
भारतीयांसाठी खेळ ही एक भावना आहे.विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीवर जिथे मॅच सुरु असेल तिथे सर्वात जास्त भारतीय समर्थक असतात. भारताच्या समर्थकांची शक्ती खेळांडूंच्या मागे असते. पण काही गोष्टी अशा घडतात की, त्यामुळे सर्व चाहत्यांचाही हिरमोड होतो आणि चाहते थेट आपली कठोर मतं व्यक्त करतात, असाच प्रकार नुकताच समोर आला आहे.

हाॅकीपटूंचा इकॉनॉमी क्लासने प्रवास
पॅरिसमध्ये भारतातून 117 खेळाडू ऑलिम्पिकसाठी गेले होते. हे खेळाडू भारतासाठी पदक मिळवायचे हे स्वप्न घेऊन गेले होते. भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहा पदकं मिळाली. हाॅकीत तर भारतीय संघाने कमालच केली. आपल्या खेळात कांस्यपदक प्राप्त करुन जेव्हा भारतीय खेळाडू मायदेशी भारतात पोहचले, तेव्हा त्यांचा पॅरिस ते नवी दिल्ली हा विमानप्रवास चक्क इकॉनॉमी क्लासचा होता. क्रिकेटरसाठी स्पेशल विमान तर ऑलिम्पिकवीरांसाठी इकॉनॉमी क्लासचा प्रवास ही बाब क्रीडा चाहत्यांना रुचलेली नाही.

श्रीजेश, अमित रोहिदासचा इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर हॉकीपटू पीआर श्रीजेश आणि अमित रोहिदास इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसले आहेत. तसं पाहीलं तर हे स्टार खेळाडू असूनही त्यांनी आपलं सामान्यपण जपलं. ते किती जमीनीवर आहेत हे यानिमित्ताने दिसून आले आहे.
हाॅकीची अहवेलना, दुर्लक्ष
भारताचा राष्ट्रीय खेळ हाॅकी आहे पण या खेळाकडं दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्जेदार खेळाडू तयार करण्यात अडचणी येतात. आर्थिक स्थिती, प्रशिक्षकांचा अभाव, खेळाचा वाढलेला खर्च यासह सुविधांही फार नसतात. त्या तुलनेत क्रिकेटला जास्त महत्व दिलं जातं. यामुळे या खेळात खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार होतात असंही सांगितलं जातं.

क्रिकेटर्ससाठी स्पेशल विमान
क्रिकेटर्संना मिळणारे मानधन, त्यांना दिले जाणारे महत्व आणि त्यांना मिळणारी प्रसिद्धी पाहता तुलनेत इतर खेळांतील खेळाडूंना हवे तितके मानधन, प्रसिद्धी आणि महत्व कमी दिलं जात. याचं एक उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेटसंघ बार्बाडोसमध्ये अडकल्यावर सरकारने त्यांच्यासाठी विमान पाठवले होते. क्रिकेटर्स सामान्यतः बिझनेस क्लासमध्ये प्रवास करतात..हॉकी संघाशी मात्र असा भेदभाव का? असा सवालही केला जात आहे.

भारतीय पदक विजेते
- भारतीय हाॅकी संघ- कांस्यपदक
- नीरज चोप्रा - रौप्यपदक (भालाफेक)
- स्वप्निल कुसाळे - कांस्यपदक (नेमबाजी 50 मीटर थ्री पोजिशन प्रकार)
- मनू भाकर - कांस्यपदक (10 मीटर वैयक्तिक प्रकार)
- मनू भाकर-सरबज्योत सिंह -कांस्यपदक (25 मीटर मिश्र)
- अमित सेहरावत - कांस्यपदक (कुस्ती)












Click it and Unblock the Notifications