Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फक्त एका गाण्यासाठी मिळाले 16 कोटी रुपये! या गायकाची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हवा

paris olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची सुरुवात 26 जुलै रोजी उद्घाटन समारंभाने झाली. उद्घाटन समारंभातील सर्वात खास गाणे म्हणजे ज्येष्ठ गायिका सेलीन डिऑन यांनी सादर केलेले गाणे. ज्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. 2020 नंतर सेलिन डिऑनचा हा पहिलाचं स्टेज परफॉर्मन्स होता.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी

सेलिन डीओन 'स्टिफ पर्सन सिंड्रोम' या ऑटोइम्यून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरशी झुंज देत होती, ज्याचा खुलासा तिने 2022 मध्ये केला. आरोग्याची प्रॉब्लेम असूनही तीने दमदार अशी कामगिरी केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहिली जात होती.

celine dion

चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय क्षण

उद्घाटन समारंभात, सेलिन डीओनने आयफेल टॉवरच्या बाल्कनीतून 'Hymne à l'amour' हे फ्रेंच गाणे गायले. 3,500 अभिनेते, डान्सर आणि गायकांच्या नेत्रदीपक कामगिरीमध्ये तिने हे गाणे गायले, त्यामुळे उपस्थितांसाठी तो एक अविस्मरणीय क्षण ठरला.

फक्त एका गाण्यासाठी 16 कोटी मिळाले

ऑलिम्पिक स्पर्धेत तिची ही पहिलीच वेळ नव्हती. सेलिनने यापूर्वी 1996 मध्ये अटलांटा ऑलिम्पिकमध्ये कामगिरी केली होती. तिच्या अलीकडील आरोग्य समस्या लक्षात घेता, कामगिरीदरम्यान तिचेआरोग्य सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांची एक टीम उपस्थित होती. पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीबद्दल सेलिन डीओनला खूप मोठी रक्कम मिळाली आहे असं एका रिपोर्ट सांगितले आहे. फक्त एका गाण्यासाठी तिला 16 कोटी रुपये मानधन मिळाल्याची माहिती आहे.

एडिथ पियाफ यांना श्रद्धांजली

आयफेल टॉवरच्या बाल्कनीत उभे राहून सेलीनने फ्रेंच गायिका एडिथ पियाफ यांना श्रद्धांजली वाहिली. तिने एडिथचे गाणे 75 वर्षांपूर्वी गायले होते त्याच भावनेने हे गाणे गायले. हे गाणे एडिथ पियाफ आणि फ्रेंच-अल्जेरियन बॉक्सर मार्सेल सेर्डन यांच्यातील दुःखद प्रेमकथा सांगते. एडिथने हे गाणे तिच्या प्रियकरासाठी लिहिले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+