Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारताविरुद्ध वादग्रस्त बोलणाऱ्या या पाकिस्तानी क्रिकेटरचे निधन?, व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ!

Shahid Afridi News, Video Viral : सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओने क्रिकेट जगताला हादरवून टाकले, ज्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांचे निधन झाल्याचा दावा केला गेला आहे. शाहिद आफ्रिदीने आता या जगाचा निरोप घेतल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. नेमकं व्हायरल झालेल्या व्हिडिओचे सत्य काय आहे, ते आज आपण जाणून घेणार आहोत.

दहशतवादी हल्ल्यानंतर आफ्रिदीने भारतविरोधात गरळ ओकली

पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून भारतातील जम्मू आणि काश्मीर भागातील पहलगाम या ठिकाणी हल्ला करण्यात आला. यामध्ये 26 लोकांचा बळी घेतला गेला. विशेष म्हणजे, धर्म विचारून मारण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पुरुषांना मारले गेले, तर त्यांच्यासोबत असलेल्या महिलांना जीवत सोडले गेले. त्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली गेली. या विदारक घटनेनंतर मात्र मोदी सरकारच्या वतीने सैन्यदलाचा सुट देण्यात आली आणि ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला.

Pakistani cricketer Shahid Afridi

कराचीमध्ये आफ्रिदीचा दफनविधी झाल्याचा दावा

अशातच, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिदी आफ्रिदी त्यांच्या भारताविरोधी वक्तव्यामुळे चर्चेत आहे. आफ्रिदीने अनेक भारतविरोधी विधाने केली आहेत. भारताविरुद्ध विष ओकल्याबद्दल त्याला खूप ट्रोल करण्यात आले. अशातच, व्हायरल व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला होता की आफ्रिदीला कराचीमध्ये दफन करण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडिओमुळे कुटुंबियांना बसला धक्का

दरम्यान, जेव्हा व्हिडिओची चौकशी करण्यात आली तेव्हा तो पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आफ्रिदीच्या व्हिडिओमध्ये कोणतेही तथ्य नव्हते. तो पूर्णपणे एआयने बनवलेला असल्याचे आढळून आले. व्हिडिओ पाहिल्यानंतर आफ्रिदीच्या कुटुंबाकडूनही प्रतिक्रिया देखील देण्यात आली.

त्यांनी तो बनावट असल्याचे म्हटले. शाहिद आफ्रिदीला कोणतीही आरोग्य समस्या नाही आणि तो पूर्णपणे निरोगी आहे. लोकांनी एआयच्या मदतीने मृत्यूचा बनावट व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. क्षणभर ते पाहून सर्वांना धक्का बसला पण नंतर सत्य बाहेर आले आहे.

नेमकं निधन कोणाचे झाले?

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते अब्बास खान आफ्रिदी यांचे नुकतेच निधन झाले आहे. हे प्रकरण त्यांच्याशी संबंधित आहे. त्यांचे निधन एका अपघातात झाले. ज्या व्हिडिओमध्ये एक न्यूज अँकर आफ्रिदीचा उल्लेख करत आहे, त्यात ती अब्बास आफ्रिदीचे नाव घेत आहे. परंतु एआयच्या मदतीने ते नाव बदलून त्यात शाहिद आफ्रिदी टाकण्यात आले.

अशाप्रकारे चुकीची अफवा पसरवल्यामुळे आफ्रिदीच्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल झाली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला तेव्हा आफ्रिदी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हे देखील तेथील लोकांना दिशाभूल करण्यासाठी करण्यात आल्याचा सांगितले गेले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+