Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'पहलगाम हल्ल्यात आपल्या देशाचा सहभाग', 'या' क्रिकेटपटूला संशय; म्हणाला- त्यांना लाज वाटायला पाहिजे

Danish Kaneria over Pahalgam terror attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. विविध लोक त्यावर प्रतिक्रिया देत दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे, अशी मागणी करत आहेत. अशातच, पहलगाममधील हल्ल्यानंतर एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने स्वत:च्या देशावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तो म्हणाला की, जर पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असेल तर त्यांना लाज वाटायला हवी, अशा शब्दात त्याने संताप व्यक्त केला.

Pakistan former cricketer Danish Kaneria

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जगभरात चर्चा होत आहे. या दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप लोकांचा जीव घेण्यात आला. त्यानंतर संपूर्ण भारतात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरियाने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामागे स्वतःच्या देशाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

त्याने त्याच्या एक्स सोशल मीडियावर पहलगाम हल्ल्यावरुन एक पोस्ट केली. त्यात तो म्हणाला की, जर पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असेल, दहशतवादाला प्रोत्साहन देत असेल तर त्यांना असे करताना लाज वाटली पाहिजे.

दानिश कनेरियाला स्वत:च्या देशावर संशय!

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाई सुरू झाली आहे. राजनैतिक आघाडीवर, भारत सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. जे पाकिस्तानला येत्या काळात मोठी हानी पोहोचवू शकतात. दरम्यान, जगातील अनेक देशांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे आणि भारतासोबत उभे असल्याचे त्यांनी सांगितले. अशातच पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने यासंदर्भात त्यांच्या देशाच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

तर पाकिस्तानला लाज वाटली पाहिजे..!

आपल्या देशावर शंका व्यक्त करताना, पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरियाने आपल्या एक्स हँडलवर लिहिले - जर पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा खरोखरच हात नाही, तर आपले पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्या मुद्द्यावर चिंता का व्यक्त केली नाही?, अचानक सैन्याला हाय अलर्टवर राहण्यास का सांगण्यात आले? कारण त्यांच्या अंतःकरणात या घटनेवरुन खोट आहे. त्यांना वास्तव काय आहे हे माहित आहे का?, कनेरियाने पुढे लिहिताना म्हटले की, जर पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असेल आणि दहशतवादाला प्रोत्साहन देत असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे.

दानिश कनेरियाचे क्रिकेट करिअर काय?

दानिश कनेरियाने पाकिस्तानकडून 61 कसोटी आणि 18 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात या लेग स्पिनरने 276 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. दरम्यान, पहलगाममधील हल्ल्यानंतर दानिशने चिंता व्यक्त केली व आपल्या देशावर संशय व्यक्त केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+