क्रिकेट विश्वावर शोककळा! पाकिस्तानी वंशाच्या 'या' क्रिकेटपटूचा मैदानात कोसळून मृत्यू, नेमकं काय घडलं
Pak origin cricketer Junaid Zafar Khan passes away : दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या क्लब क्रिकेट सामन्यादरम्यान तीव्र उष्णतेमुळे पाकिस्तानी वंशाचा खेळाडू जुनैद जफर जमिनीवर कोसळला, त्याला त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले पण तो वाचू शकला नाही.
अॅडलेडमधील कॉनकॉर्डिया कॉलेज ओव्हलमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान ही दुःखद घटना घडली. या घटनेने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
ऑस्ट्रेलियन मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, कॉनकॉर्डिया कॉलेजमध्ये हा सामना कडक उन्हात खेळवला जात होता. जुनैद जफर ओल्ड कॉनकॉर्डियन्सकडून खेळत होता.
मैदानावर कोसळला अन् जागीच ठार झाला
हवामान अहवालानुसार, प्रिन्स अल्फ्रेड ओल्ड कॉलेजियन्स विरुद्धच्या या सामन्यादरम्यान तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. 40 वर्षीय जुनैद जफर दुपारी 4 वाजता फलंदाजी करत असताना अचानक मैदानावर कोसळला.
तो मैदानावर बेशुद्ध पडल्यानंतर, इतर खेळाडू आणि कर्मचाऱ्यांनी त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. वैद्यकीय पथकाने त्याला सीपीआर दिला पण त्याला वाचवता आले नाही. यावेळी जुनैद 37 चेंडूत 16 धावा काढून खेळत होता.

जुनैदच्या मृत्यूचे कारण बनले उष्ण हवामान
ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे, या सामन्यादरम्यान तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. जुनैदने पहिल्या 40 षटकांसाठी क्षेत्ररक्षण केले आणि नंतर फलंदाजीला आला. जुनैद हा पाकिस्तानचा आहे पण 2013 मध्ये नोकरीच्या शोधात ते ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे गेले होते.
क्लबने शोक व्यक्त केला
क्रिकेट क्लबने क्रिकेटपटूच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जुनैद जफर यांच्या निधनाने त्यांना खूप दुःख झाले आहे.
वैद्यकीय पथकाने त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण दुर्दैवाने त्याला वाचवता आले नाही. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना मी संवेदना व्यक्त करतो.












Click it and Unblock the Notifications