Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

paris olympics 2024 : भारताच्या झोळीत 6 वे पदक, अमन सेहरावतने तिरंगा फडकावला

paris olympics 2024 : भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने चमकदार कामगिरी करत शुक्रवारी कांस्यपदकावर कब्जा केला. त्याने पोर्तो रिकोचा कुस्तीपटू डॅरियन तोई क्रूझचा 13-5 असा पराभव केला. पहिल्या फेरीतच अमन 6-3 ने आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत अमनने ही आघाडी आणखी घेतली आणि क्रुझला पुनरागमनाची संधी दिली नाही.

Aman Sehrawat

अमनने हे पदक त्याच्या दिवंगत पालकांना समर्पित केले. अमनला इथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. विजयानंतर अमन म्हणाला, 'मला हे पदक माझ्या आई-वडिलांना आणि देशवासीयांना समर्पित करायचे आहे. माझी नजर पदकावर होती.

मी या सामन्यात सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यावर दबाव टाकला होता आणि त्यात मी यशस्वी झालो.' अमनला उपांत्य फेरीत जपानच्या रे हिगुचीकडून 0-10 असा पराभव पत्करावा लागला. कांस्यपदकाच्या लढतीत त्याने सुरुवातीपासूनच दडपण निर्माण केले आणि प्रतिस्पर्ध्याला फारशी संधी दिली नाही.

पंतप्रधान मोदींनी अमन सेहरावतचं केलं अभिनंदन

भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे. या यशाबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. सेहरावतचे प्रयत्न आणि यश हे भारतीय कुस्तीपटूंसाठी प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की "आमच्या कुस्तीपटूंचा अधिक गौरव... धन्यवाद! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अमन सेहरावतचे अभिनंदन. त्याचे समर्पण आणि चिकाटी स्पष्टपणे दिसून येते," देश या उल्लेखनीय कामगिरीचा आनंद साजरा करत आहे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+