मनू भाकर मायदेशी पोहचली, दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत होतात म्हणाली - एवढे प्रेम पाहून भारावले
ParisOlympics2024 मधील ऐतिहासिक कामगिरीनंतर दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरचे दिल्ली विमानतळावर आगमन झाल्यानंतर तिचे भव्य स्वागत करण्यात आले. तिच्या स्वागतासाठी चाहत्यांसह तिच्या नातेवाईकांनी नवी दिल्ली विमानतळावर आधीच जोरदार तयारी केली होती.
मायदेशी परतल्यानंतर ती भारावून गेली. तिचे जोरदार स्वागत झाल्यानंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली असून एवढे प्रेम पाहून भारावले अशी तिने प्रतिक्रिया दिली. नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी इतिहास रचला. भारतासाठी 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात दोन कास्यपदकं जिंकली. तिच्या कामगिरीमुळे भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकाचे खाते उघडले आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय नेमबाज मनूचे स्वागत करण्यासाठी तिचे पालक दिल्ली विमानतळावर पोहोचले आहे. दरम्यान मनूचे दिल्ली विमानतळावर स्वागत झाले. विमानतळाच्या बाहेर येताच मनूच्या पालकांनी तिला मिठी मारली. मनूसोबत तिचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचेही जोरदार स्वागत झाले आहे.
#WATCH | Double Olympic medalist Manu Bhaker receives a grand welcome after she arrives at Delhi airport after her historic performance in #ParisOlympics2024
— ANI (@ANI) August 7, 2024
She won bronze medals in Women’s 10m Air Pistol & the 10m Air Pistol Mixed team event. pic.twitter.com/rcVgqkaxjP
विमानतळावर वाद्यांसह आनंदोत्सव
पॅरिसहून येणारी मनू भाकर हि लवकरच नवी दिल्लीतील विमानतळावर दाखल होणार आहे. तिच्या स्वागतासाठी ढोल, ताशे आणि इतर वाद्यांसह अनेक लोक जमले आहेत. तिथे ते मनू येण्याची वाट पाहत आनंदोत्सव साजरा करत आहेत. हातात मनू भाकरचे फोटो आणि पोस्टर्स घेऊन लोक जमले आहेत.

मनू पहिली महिला नेमबाज
मनू एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय बनली आणि त्याबरोबरच ती खेळांमध्ये पदक जिंकणारी देशाची एकमेव महिला नेमबाज बनली आहे. मनूने महिला वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये आणि सरबजोत सिंगसह मिश्र स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
Fans celebrate outside Delhi airport to welcome back Indian shooter @realmanubhaker, who brought home two medals from the #ParisGames. Manu Bhaker won bronze in Women’s 10m Air Pistol & the 10m Air Pistol Mixed team event.#OlympicGames #Olympics #Paris2024 #Cheer4Bharat… pic.twitter.com/NmToIAbF7L
— DD News (@DDNewslive) August 7, 2024
एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात मनू भारताचा ध्वजवाहक असेल. रविवारी समारोप समारंभासाठी मनू पॅरिसला परतणार आहे.

मनू भाकरची विजयी मिरवणूक
ऐतिहासिक ParisOlympics2024 मधून परतल्यानंतर दिल्लीत मनूचे भव्य स्वागत होत आहे. "इथे इतके प्रेम मिळाल्याने मला खूप आनंद झाला..." असे मनू यावेळी म्हणाली. ती चाहत्यांच्या स्वागताने भारावून गेली. दम्यान मनू भाकरची विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी फुलांनी सजवलेली गाडीत मनू बसली असून तिच्यासोबत तिचे काकाही आहेत. माध्यमांशी बोलताना तिच्या काकाने सर्वांचे आभार मानले आहेत.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम







Click it and Unblock the Notifications