Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नितीश रेड्डीचं दमदार शतक, स्टेडियममध्ये वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू , टीम इंडियाचं दमदार पुनरागमन

Nitish Kumar Reddy Century: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी यांनी दमदार फलंदाजी करत कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावलं आहे. मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीश कुमार रेड्डी यांनी संघाचा डाव सांभाळत शानदार फलंदाजी केली. नितीश कुमार रेड्डी यांची फलंदाजी पाहून सोशल मीडियावर चाहते त्यांचे खूप कौतुक करत आहेत.

नितीशकुमार रेड्डीचं दमदार शतक

नितीश कुमार रेड्डी यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक मेलबर्न कसोटीत झळकावलं आहे. त्याचे हे शतक टीम इंडियासाठी टर्निंग पॉइंट ठरलं. कारण भारतीय संघ फॉलोऑन टाळण्यासाठी संघर्ष करत असताना अशा महत्वपूर्ण वेळी ही खेळी आली. नितीशने 172 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, ज्यात त्याने 10 चौकार आणि 1 षटकारही लगावला.

Nitish Kumar Reddy

नितीशच्या वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू

या शतकानंतर स्टेडियममध्ये उपस्थितीत असलेले नितीश कुमार रेड्डीच्या वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसले. नितेशच्या या खेळीने क्रिकेटप्रेमींसह वडीलांना हा सामन्याच आनंद लुटला. नितीश रेड्डी ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू बनून इतिहास रचला आहे. नितीशने वयाच्या 21 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. या विक्रमासह त्याने भारतीय क्रिकेटमधील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियात नितीश रेड्डी यांच्या आधी सचिन तेंडुलकर आणि ऋषभ पंत हे एकमेव भारतीय फलंदाज आहेत ज्यांनी कमी वयात शतके झळकावली होती. सचिन तेंडुलकरने 1992 मध्ये सिडनी येथे वयाच्या 18 वर्षे 253 दिवसात ऑस्ट्रेलियात पहिले शतक झळकावले होते. त्यानंतर 30 दिवसांतच त्याने पर्थमध्ये आणखी एक शतक झळकावले होते. अशा प्रकारे सचिनने आपल्या तरुण वयात ऑस्ट्रेलियात चमकदार कामगिरी केली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+