Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूने कोकेनच्या नशेत ठोकले चौकार आणि षटकार, आता आली बंदी

कुठल्याही खेळात अमली पदार्थांच्या सेवनावर बंदी असते. वैयक्तिक क्रीडा प्रकारात अनेकदा खेळाडू अमली पदार्थांचे सेवन करतात आणि चांगल्या कामगिरीची नोंदही करतात. पण अमली पदार्थ सेवन चाचणीत ते दोषी आढळले की त्यांच्यावर बंदीची कारवाई केली जाते. जाणते अजाणतेपणेही अमली पदार्थांचे सेवन झाल्याच्या घटना क्रीडाविश्वात घडल्या आहेत. अनेक खेळाडूंची क्रीडा विश्वातील कारकीर्द देखील त्यामुळे संपुष्टात आली आहे. कोकेन हा एक असा अमली पदार्थ आहे ज्यावर क्रीडा विश्वात बंदी घालण्यात आली आहे. मात्र न्यूझीलंडच्या एका क्रिकेटपटूने कोकेनचे सेवन करून क्रिकेट सामन्यासाठी मैदानात प्रवेश केला. मैदानात त्याने अष्टपैलू कामगिरीही केली. कोकेनचे सेवन केल्याच्या आरोपाखाली तो दोषी आढळला आणि आता त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

न्युझीलंडमध्ये एका देशांतर्गत टी 20 सामन्यात ही घटना घडली. कोकेनचे सेवन केलेल्या या खेळाडूने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे असे की गोलंदाजीत तुफानी कामगिरी केल्यानंतर तशीच जबरदस्त फलंदाजी करीत या खेळाडूने विजयश्री खेचून आणली. त्याच्या चौफेर कामगिरीची एकच चर्चा स्थानिक क्रिकेटमध्ये झाली होती.

New Zealand cricketer

ब्रेसवेल असे या 34 वर्षे खेळाडूचे नाव असे आहे. सेंट्रल डिस्ट्रिक्ट या संघाकडून वेलिंग्टनच्या विरोधात खेळताना तो कोकेनची नशा करून आला होता. त्याच्यावर आता एक महिन्याच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. कोकेनचे सेवन केल्याच्या आरोपाखाली तो या वर्षीच्या जानेवारी महिन्यात तो पॉझिटिव्ह सापडला होता आणि त्याची शिक्षाही एप्रिल पर्यंतच होती जी आता पूर्ण झाली आहे.

मात्र आता असे निदर्शनास आले आहे की सामन्याच्या आधीच ब्रेसवेल याने कोकेनचे सेवन केले होते. स्पोर्ट इंटेग्रिटी कमिशन ने हा खुलासा केला आहे. ब्रेसवेल याने त्या सामन्यात अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. गोलंदाजी करताना त्याने वेलिंग्टनच्या फलंदाजांना आपल्या अचूक माऱ्याने त्रस्त करून सोडले. अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करताना ब्रेसवेल याने 21 धावात दोन वेलिंग्टन संघाचे गडी बाद केले होते. गोलंदाजी झाल्यानंतर लगेचच सेंट्रल डिस्ट्रिक्टचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. ब्रेसवेल यालाही फलंदाजीची संधी मिळाली. फलंदाजीत ब्रेसवेलचे आणखी रौद्ररूप बघायला मिळाले. तुफानी फलंदाजी करताना त्याने अवघ्या 11 चेंडूत 30 धावा केल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कोकेनच्या नशेतच त्याने सामन्यात सहभाग घेतला आणि संघाला विजय देखील मिळवून दिला.सध्या ब्रेसवेलच्या या अनोख्या कामगिरीची चर्चा न्यूझीलंडच्या क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+