नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गाजवणार मैदान! कधी आहे सामना, कुठे पाहू शकता प्रक्षेपण? घ्या जाणून
मुंबई - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकून आपली ताकद दाखवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज आहेत. भारतासाठी पदकाच्या दावेदारांमध्ये नीरज चोप्राचे नाव आघाडीवर आहे. निरज चोप्रा, उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, तो आपल्या प्रतिष्ठित विजेतेपद राखण्यासाठी पॅरिसला जात असताना आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करणार आहे.
भालाफेकीत पहिले सुवर्ण मिळवून दिले
निरज चोप्राने भालाफेकीत भारताला ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्डमध्ये पहिले सुवर्ण मिळवून दिले. यावेळीही चोप्राकडून पूर्ण आशा आहे की तो जागतिक पटलावर ऑलम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत भारताला गौरव मिळवून देईल. या स्पर्धेत नीरज चोप्राचा सामना कधी आहे आणि चाहत्यांना हा सामना भारतात कुठे थेट पाहता येईल ते पाहूया.

नीरज चोप्राची लढत कधी?
भालाफेक स्पर्धेत, गट अ आणि ब गटासाठी पात्रता फेरी 6 ऑगस्ट रोजी होईल, तर अंतिम सामना 8 ऑगस्ट 2024 रोजी खेळवला जाईल. गट अ साठी पात्रता फेरी 6 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1:50 वाजता आणि ब गटासाठी भारतीय वेळेनुसार दुपारी 3:20 वाजता सुरू होईल. जर नीरज अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर सामना 8 ऑगस्ट रोजी रात्री 11.55 वाजता सुरू होईल.
..हा सामना कुठे पाहू शकता?
नीरज चोप्राचा फेडरेशन कप 2024 भालाफेक अंतिम सामना ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर लाइव्ह स्ट्रीमिंगवर उपलब्ध आहे. हा कार्यक्रम भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर थेट प्रसारित होणार नाही.
'या' जर्मन दिग्गजांशी स्पर्धा
यावेळी नीरजसाठी सुवर्णपदक पटकावणे सोपे जाणार नाही, कारण त्याला जर्मनीच्या मॅक्स डेहनिंग आव्हान देणार आहे. या खेळाडूने यावर्षी फेब्रुवारीमध्ये भालाफेक स्पर्धा खेळली होती. यात 90.20 मीटर भालाफेक करुन सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
कुठे करतोय नीरज चोप्रा सराव?
अनुभवी थ्रोअर निरज चोप्रा सध्या उन्हाळी खेळांच्या तयारीसाठी अंतल्या, तुर्की येथे आहे. नीरज चोप्राचे जर्मन प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिट्झ यांनी पीटीआयला सांगितले की, 'सर्व काही प्लॅननुसार सुरू आहे. सध्या, त्यात कोणतीही अडचण नाही. आशा आहे की हीच कामगिरी ऑलिम्पिकपर्यंत हे अशीच राहील.












Click it and Unblock the Notifications