नीरज चोप्राला भारतीय सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल पद बहाल; जाणून घ्या किती मिळणार पगार?

Neeraj Chopra Honorary Lieutenant Colonel : भारताचा स्टार ॲथलीट आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्यात एक महत्त्वाचा आणि मानाचा सन्मान मिळाला आहे. नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल हे पद बहाल करण्यात आले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत एका विशेष समारंभात त्यांना हे पद प्रदान करण्यात आले.

या सन्मान सोहळ्यामध्ये नीरज चोप्रा लष्करी गणवेशात उपस्थित होते. संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या खांद्यावर राष्ट्रीय चिन्ह आणि तारा लावून त्यांना औपचारिकरित्या ही पदवी प्रदान केली. या समारंभात संरक्षण मंत्र्यांव्यतिरिक्त लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी तसेच नीरजची आई आणि पत्नी देखील उपस्थित होत्या.

neeraj chopra honorary lieutenant colonel

नीरज चोप्रा यांची लष्करी कारकीर्द

नीरज चोप्रा यांची लष्करी कारकीर्द खालच्या पदापासून सुरू झाली आणि आता ते लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांनी सुरुवातीला नायब सुभेदार म्हणून भारतीय सैन्यात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची पदोन्नती होऊन ते सुभेदार बनले. तीन वर्षांपूर्वी नीरज यांना मेजर पद मिळाले होते. आता, औपचारिक समारंभात त्यांना मानद लेफ्टनंट कर्नल हे पद प्रदान करण्यात आले आहे. या पदाची घोषणा एप्रिलमध्येच करण्यात आली होती आणि तेव्हापासून त्यांची नियुक्ती प्रभावी झाली होती.

लेफ्टनंट कर्नल म्हणून नीरज चोप्रा यांचा पगार किती?

नीरज चोप्रा यांना मानद लेफ्टनंट कर्नल हे पद मिळाल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या वेतनाबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. भारतीय संरक्षण अकादमीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावरील अधिकाऱ्याला ७ व्या वेतन आयोगानुसार मासिक वेतन ₹१,२१,२०० ते ₹२,१२,४०० दरम्यान या वेतन रचनेत इतर भत्ते आणि सुविधा समाविष्ट नसतात, त्यामुळे त्यांचा एकूण पगार या मर्यादेपेक्षा अधिक असू शकतो.

नीरज चोप्रा यांची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी

टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांची कामगिरी सतत उत्कृष्ट राहिली आहे. त्याने पॅरिसमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.ते डायमंड लीगमध्येही चॅम्पियन राहिले आहेत.तसेच, त्यांनी बेंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकून देशासाठी सतत चांगले काम करण्याचा त्यांचा प्रयत्न कायम ठेवला आहे. नीरज चोप्रा यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा आणि देशासाठी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा गौरव आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+