गोल्डनबाॅय नीरज चोप्रा आता झाला लेफ्टनंट कर्नल, धोनी, सचिननंतर तिसरा खेळाडू
Neeraj Chopra becomes Lt. Colonel honoured by President : भालाफेक क्रीडा प्रकारात भारताला टोकिया येथे2021 मध्ये झालेल्या ऑलम्पिक मध्ये जेवलिन थ्रो म्हणजे भाला फेक या क्रीडा प्रकारात सूवर्ण मिळवून देत त्याने इतिहास घडवला होता. आता भारताच्या या गोल्डनबाॅयला आणखी एक बहुमान मिळाला आहे. अभिमानाने छाती फुलावी अशी गोष्ट घडली आहे. भारतीय लष्करात आता नीरज चोप्राचा लेफ्टनंट कर्नल म्हणून राष्ट्रपतींकडून सन्मान झाला आहे. अलिकडचा विचार केल्यास क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यानंतर तो तिसरा क्रीडापटू ठरला आहे.

पहलगाम हल्ल्यावर नीरज चोप्राची भावना
अलिकडेच नीरज चोप्रा याने पहलगाम हल्ल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. पहलगाम हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. या हल्ल्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, यात भारताचा गोल्डनबाॅय नीरज चोप्राही मागे नव्हता. सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करुन त्याने म्हटले होते की, "जम्मू आणि काश्मीरमधील दुःखद हल्ल्याने मन दुखावले आहे. पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना."
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. यानंतर पाकिस्तानला भारतासमोर गुढघे टेकायला भाग पाडले. दोन्ही देशातील सीजफायरनंतर ऑपरेशन सिंदूर अनिश्चित कालावधीसाठी स्थगित झालेले आहे. यानंतर भारतीय लष्कराचे मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूर येथील एअरबेसवर गेले होते. तेथे त्यांनी भारतीय जवानांना सलाम केला आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे. यानंतर आज गोल्डन बॉय ऑलिंपिक विजेता नीरज चोप्राही याच भारतीय सैन्य दलाचा एक भाग झाला आहे. नीरज चोप्राला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल पदाचा बहुमान देण्यात आला आहे.

नीरज चोप्राची कारकीर्द
- भारतीय टेरिटोरियल आर्मी रेग्युलेशन 1948 च्या Para-31 नुसार नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्य दलात सहभागी करुन घेण्यात आले आहे.
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल पदी नियुक्ती देण्यात आली आहे. यापुर्वी नीरज चोप्रा राजपूताना रायफल्समध्ये सुभेदार पदावर कार्यरत होता.
- सन 2016 साली तो नायब सुभेदार पदावर भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. आता, त्याला बढती मिळाली असून थेट लेफ्टनंट कर्नल बनला आहे.
नीरज चोप्रा आणि यश
नीरज चोप्राचा प्रवास 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणातील पानिपत येथील खंद्रा गावात सुरू झाला. शेतीवर आधारित कुटुंबात वाढलेल्या चोप्राला लहानपणीच लठ्ठपणाचा सामना करावा लागला. यावर उपाय म्हणून, त्याच्या वडिलांनी त्याची फिटनेस सुधारण्यासाठी त्याला जिममध्ये दाखल केले. भालाफेक करण्याची त्याची प्रतिभा प्रथम पानिपत क्रीडा प्राधिकरणातील प्रशिक्षक जयवीर चौधरी यांनी लक्षात घेतली आणि तो भालाफेकपटू बनला.












Click it and Unblock the Notifications