Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उत्तराखंड होतंय भारताचे नवीन क्रीडा केंद्र; भव्यदिव्य ठरला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा- 2025 चा समारोप

उत्तराखंडच्या हल्हानी येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात आयोजित 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप आज झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे उपस्थित होते. या कार्यक्रमात गृहमंत्र्यांनी उत्तराखंडचे क्रीडा केंद्रात रूपांतर झाल्याबद्दल कौतुक केले. तसेच तेथील सरकारला राज्यभरातील क्रीडा सुविधांच्या विकासाचे श्रेय दिले.

sports competition

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मांडविया म्हणाले की, "राष्ट्रीय खेळ आज संपत आहेत. येत्या काळात भारताला क्रीडा केंद्र बनवण्याचा प्रवास आजपासून सुरू झाला आहे. खेळांमध्ये आपण जिंकतो किंवा शिकतो. आपल्याला जगाला संदेश द्यायचा आहे की, आपण अर्जुनसारख्या शूर योद्ध्यांच्या देशातून आलो आहोत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे."

ही पाच राज्ये ठरले अव्वल

या स्पर्धेत सेवा संघाने 68 सुवर्णांसह 121 पदके जिंकत या स्पर्धेत अव्वल स्थान पटकाविले. त्यानंतर सुवर्णपदक न मिळवताही 198 पदके जिंकून महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर राहिला. हरियाणा 153 पदकांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. कर्नाटक आणि मध्य प्रदेशने पहिल्या पाच स्थानांवर स्थान मिळवले.

sports competition

10 हजार खेळाडूंचा सहभाग

या खेळांमध्ये 38 संघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुमारे 10,000 खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धा हरिद्वार, नैनिताल, हल्द्वानी, रुद्रपूर, शिवपुरी आणि नवीन टिहरी या सहा शहरांमध्ये पार पडल्या. या कार्यक्रमात अ‍ॅथलेटिक्स, नेमबाजी, कुस्ती, पोहणे, हॉकी, बॉक्सिंग, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, फुटबॉल, टेनिस आणि टेबल टेनिस यासारख्या ऑलिंपिक खेळांचा समावेश होता.

मोदींच्या हस्ते झाले उद्धाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 जानेवारी रोजी देहरादून येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये या खेळांचे उद्घाटन केले. मुख्य कार्यक्रमांसोबत कलारिप्पट्टू, योगासन, मल्लखांब आणि राफ्टिंग यासारखे प्रात्यक्षिक खेळही झाले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी या खेळांचे आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच समारोप समारंभात मान्यवरांचे हार्दिक स्वागत केले.

हे ठरले उल्लेखनीय खेळाडू

या स्पर्धेत ऑलिंपिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहेन (बॉक्सिंग), स्वप्नील कुसाळे (शूटिंग), सरबजोत सिंग (शूटिंग) आणि विजय कुमार (शूटिंग) यासारख्या प्रमुख भारतीय खेळाडूंनी भाग घेतला.

सुविधांचे झाले कौतूक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना उत्तराखंड सरकारने सर्वोत्तम सुविधा पुरविल्या. महत्वाच्या ठिकाणी २४ तास वैद्यकीय पथके सज्ज होती. कार्यक्रम स्थळांना निवास सुविधांशी जोडणाऱ्या ई-रिक्षा आणि बस सेवांसह कार्यक्षम वाहतुकीची तरतूदही करण्यात आली होती. खेळाडूंच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी विविध राज्यांचे पौष्टिक जेवणही उपलब्ध करुन देण्यात आले होते.

डेहराडूनमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम अत्याधुनिक सुविधांनी अद्ययावत करण्यात आले होते. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली राज्याने खेळाडूंचे स्वागत आणि मूल्यवान वाटावे यासाठी खूप प्रयत्न केले. स्थानिक स्वयंसेवक आणि क्रीडा समन्वयकांच्या सहभागापासून ते विविध राज्यांच्या परंपरा प्रदर्शित करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनापर्यंत उत्तराखंड सरकारने हा कार्यक्रम एकदम भव्यदिव्य केला. उद्धाटन व समारोपात दिसलेले सांस्कृतिक कार्यक्रम केवळ मनोरंजनच करताना दिसले नाही तर, राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक रचनेची झलक त्यातून दिसली.

जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि आदरातिथ्यामुळे हा कार्यक्रम केवळ स्पर्धाच नाही, तर क्रीडाभावना आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा उत्सव बनला. या विचारशील नियोजन आणि अंमलबजावणीमुळे उत्तराखंड भविष्यातील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी एक आदर्श म्हणून स्थापित झाला आहे. खरी क्रीडाभावना खेळाच्या मैदानाच्या सीमा ओलांडते, हेच यातून दिसून आले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+