राष्ट्रीय क्रीडा दिन :मिल्खा सिंग, पीटी उषा ते विनेशपर्यंत 'या' 7 खेळाडूंचं ऑलिम्पिक पदक हुकलं! वाचा
National Sports Day : मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. कारण त्यांनी असे काही केले होते जे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटले जायचे. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही त्यांनी देशासाठी सुवर्णपदके जिंकली होती.
त्यांच्यासारखेच अनेक खेळाडूंनी कर्तृत्व गाजवलं पण अनेक दिग्गजांना ऑलिम्पिक पदकं मिळता मिळता राहीलं , जणून तोंडचाच घास पळवला गेला. भारतातील असेही काही दिग्गज खेळाडू आहेत जे ऑलिम्पिक पदक जिंकण्यापासून वंचित राहीले.

मिल्खा सिंग
मिल्खा सिंग यांना 'फ्लाइंग सिख' म्हणूनही ओळखलं जातं, त्यांची कहाणी हृदयद्रावक आहे. 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर शर्यतीत पदक जिंकण्यासाठी मिल्खा सिंग हे सर्वात मोठे दावेदार होते. पहिल्या 200 मीटरमध्ये आघाडी घेतल्यानंतर, क्षणभर मागे वळून पाहण्यात त्याचा मौल्यवान वेळ गेला अन् दक्षिण आफ्रिकेच्या माल्कम स्पेन्सने आघाडी घेतली आणि सिंगला 45.73 सेकंदांसह चौथ्या स्थानावर सोडले. ते कांस्यपदकापासून फक्त 0.1 सेकंद मागे होते.
पीटी उषा
जिला भारताची उडनपरी म्हटलं जातं ती पीटी उषा 1984 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये, तिनं 400 मीटर अडथळा शर्यतीत भाग घेतला, ही महिलांसाठी एक नवीन स्पर्धा होती. उषाने हीट्समध्ये 56.81 सेकंद आणि उपांत्य फेरीत 55.54 सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रकुल विक्रम केला.
मात्र, फायनलमध्ये चुकीच्या सुरुवातीमुळं तिचा वेग विस्कळीत झाला. तिचे कांस्य पदक अगदी थोड्या अंतरानं हुकलं.
सानिया मिर्झा
2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या टेनिसच्या आशा सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या मिश्र दुहेरीच्या जोडीवर टिकून होत्या. या जोडीनं ब्रिटनच्या अँडी मरे आणि हेदर वॉटसन यांचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली, मात्र दमदार सुरुवात केल्यानंतरही त्यांना अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्स आणि राजीव राम यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
विनेश फोगट
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो कुस्तीमध्ये अंतिम फेरीत पोहोचली होती, परंतु सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी तिचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्यानं ती अपात्र ठरली आणि ती पदकाच्या शर्यतीतून बाहेर गेली. विनेशनं पदक जिंकलं नसलं तरी मन जिंकल. ती संघषरत खेळाडू आहे पण तिनं आपल्यासोबत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे घडलं त्यानंतर कुस्तीतून निवृत्ती घेतली.
दिपा कर्माकर
2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्समधील कामगिरीमुळं दीपा कर्माकर भारतात एक प्रसिद्ध नाव बनलं होतं. 52 वर्षात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली. कर्माकर हिनं अंतीम सामन्यात कांस्यपदक गमावलं. ती कांस्यपदक विजेत्यापेक्षा फक्त 0.150 गुणांनी मागे अन् चौथ्या स्थानावर राहिली
अदिती अशोक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आदितीने गोल्फमध्ये आश्चर्यचकित केलं. महिलांच्या स्ट्रोक प्ले स्पर्धेत ती सलग तीन फेऱ्यांमध्ये पदकाच्या शर्यतीत होती पण चौथ्या फेरीत ती मागे पडली. यानंतर ती दुसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली आणि बाहेर पडली.
जयदीप कर्माकर
जयदीप कर्माकरने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल प्रोन स्पर्धेत भाग घेतला. जोरदार पुनरागमन करूनही तो इतर नऊ जणांसोबत बरोबरीत होता आणि अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी त्याला शूट-ऑफमध्ये भाग घ्यावा लागला. कर्माकर जायबंदी झाल्यानंतरही झुंज देत होता पण चौथ्या स्थानावर राहिला आणि केवळ 1.9 गुणांनी कांस्यपदक हुकले.












Click it and Unblock the Notifications