Bajrang Punia Net Worth: करोडपती बजरंग पुनियावर नाडाची बंदी, जाणून घ्या किती आहे त्यांची संपत्ती ?
Bajrang Punia Net Worth : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियावर नॅशनल एंटी-डोपिंग एजन्सीने चार वर्षांची बंदी घातली आहे. या बंदीनंतर आता पुनिया पुढील चार वर्षे कुस्ती खेळू शकणार नाही. तसेच देशात किंवा परदेशातील कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही.
हरियाणातील झज्जर जिल्ह्यात जन्मलेल्या बजरंगने कुस्तीच्या क्षेत्रात देशाचे नाव उंचावले आहे. त्याची कहाणी लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. मात्र गेल्या काही काळापासून तो खेळाव्यतिरिक्त अनेक वक्तव्यांमुळे आणि वादांमुळे नेहमीच चर्चेत आहे.

बजरंग आहे करोडोच्या संपत्तीचा मालक
अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेला पुनिया आज एक लक्झरी लाइफ जगत आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 4 पदके जिंकणारा एकमेव भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया 15 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. तो कुस्ती आणि जाहिरातीतून सर्वाधिक कमाई करतो आणि त्याला सरकारकडून पगारही मिळतो.
कुस्तीशिवाय तो जाहिरातींमधूनही पैसे कमावतो. बजरंगने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत. हरियाणा सरकार, भारत सरकार आणि इतर संस्थांनी दिलेल्या पुरस्कारांमध्ये त्याने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. तो Adidas, Tata Motors, आणि JSW Sports सारख्या ब्रँडचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे, ज्यातून तो प्रचंड पैसा कमावतो.
रिअल इस्टेटमध्ये बजरंगची मोठी गुंतवणूक
ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर बजरंगने आपल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा रिअल इस्टेटमध्ये गुंतवला आहे. बजरंगला हरियाणा सरकारकडून रोख बक्षीस, जमीन आणि इतर सुविधा मिळाल्या आहेत. याशिवाय त्यांना अर्जुन पुरस्कार, पद्मश्री आणि खेलरत्ननेही सन्मानित करण्यात आले आहे. बजरंगने आपल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा रिअल इस्टेट आणि इतर क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.
बजरंगकडे काही लक्झरी कार आहेत, ज्यात रेनॉल्ट किगर, टोयोटा फॉर्च्युनर आणि ऑडी 7 सारख्या कारचा समावेश आहे. 2018 मध्ये भारतीय कुस्ती महासंघाच्या करारात त्याचा ए ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला होता. बजरंग रेल्वेमध्ये ओएसडी म्हणून तैनात होते, ज्यासाठी त्यांना दरमहा एक लाख रुपये पगार मिळत होता.












Click it and Unblock the Notifications