IPL खेळणार का?, MS धोनीने दिले गुगली उत्तर; म्हणाला- मी निरोप घेत नाहीये अन् परत येईल हे ही...
MS Dhoni, IPL 2025 : आयपीएलच्या शेवटच्या लीग सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) ने गुजरात टायटन्स (GT) वर विजय मिळवला. कायम पराभवाचा सामना करत आलेल्या सीएसकेने त्यांचा शेवटचा सामना जिंकून आनंदोत्सव साजरा केला. या सामन्यानंतर एमएस धोनीने त्याच्या आयपीएलच्या भविष्याबाबत भूमिका स्पष्ट केली. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया सविस्तरपणे.
आयपीएल पुढील वर्षी खेळायचे आहे की नाही, या निर्णयावर धोनी म्हणाला की, यासाठी तो थोडा वेळ घेईल आणि पुढील हंगामात खेळायचे की नाही हे येत्या दोन ते तीन महिन्यांत ठरवेल, अशी भूमिका त्याने मांडली.
तो म्हणाला की, 'माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी ४-५ महिने आहेत.' काय करायचे याची घाई नाही. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दरवर्षी 50% पेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतात. हे क्रिकेटचे सर्वोच्च स्थान आहे.

..तर 22व्या वर्षीच खेळाडूंना निवृत्ती घ्यावी लागेल
तो पुढे बोलताना म्हणाला की, जर खेळाडू कामगिरीच्या आधारावर निवृत्त होऊ लागले तर त्यापैकी बरेच जण वयाच्या 22 व्या वर्षी निवृत्त होतील. तुमच्याकडे किती भूक आहे, तुम्ही किती तंदुरुस्त आहात आणि तुम्ही संघात किती योगदान देऊ शकता आणि संघाला तुमची गरज आहे का या सर्व गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत.
माझ्याकडे पुरेसा वेळ, त्यानंतर निर्णय घेईल
धोनी पुढे बोलताना म्हणाला की, माझ्याकडे पुरेसा वेळ आहे. मी रांचीला परत जाईन, मी खूप दिवसांपासून घरी गेलो नाही. तिथे गेल्यावर मी काही रायडिंगचा आनंद घेईल. मग दोन-तीन महिन्यांनी निर्णय घेईन. धोनी पुढे म्हणाला, 'मी असे म्हणत नाही की मी आता संपलो आहे आणि मी असे देखील म्हणत नाही की मी पुनरागमन करेन, मला आता वेळेनुसार निर्णय घ्यावा लागणार आहे.
हा हंगामातील शेवटचा सामना कसा पार पडला
- इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 च्या 67 व्या सामन्यात, गुजरात टायटन्स (जीटी) आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात सामना झाला. 25 मे (रविवार) रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने 83 धावांनी विजय मिळवला.
- या सामन्यात गुजरात टायटन्सना जिंकण्यासाठी 231 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ 18.3 षटकांत 147 धावांवर ऑलआउट झाला. चालू हंगामातील चेन्नई सुपर किंग्जचा हा शेवटचा सामना होता, म्हणजेच त्यांनी विजयासह निरोप घेतला.
- चेन्नई सुपर किंग्जने 14 सामने खेळले आणि 4 जिंकले. चेन्नई सुपर किंग्ज पॉइंट टेबलमध्ये 10 व्या आणि शेवटच्या स्थानावर राहिले.
- दुसरीकडे, गुजरात टायटन्सचा 14 सामन्यांमधील हा 5 पराभव होता. गुजरात टायटन्स अजूनही 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. गुजरात टॉप-2 मध्ये राहील की नाही हे आगामी लीग सामन्यांवरून ठरवले जाईल.












Click it and Unblock the Notifications