मोहम्मद सिराजची बुमराहच्या विक्रमाची बरोबरी, पण टाॅप 5 सोडा, 20 मध्येही तो नाही! कोण कितव्या स्थानी?
Mohammed Siraj equals Bumrah's record but he is not top 20 bowlers : भारताचा हुरहुन्नरी गोलंदाज मोहम्मद सिराज याने आपल्या टेस्ट कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली असून भारताला इंग्लडविरुद्ध पाचवा कसोटी सामना जिंकून दिला एवढेच नाही तर भारताला कसोटी मालिकेच्या पराभवापासून सुद्धा त्याने वाचवले आहे. भन्नाट, अद्भूत, जादूई गोलंदाजी असे काही वर्णन सिराजच्या गोलंदाजीचे करावे तेवढे कमी आहे पण या पठ्ठ्याने जगातील नंबर वन गोलंदाज जसप्रित बुमराहच्या एका विक्रमाची बरोबरी केली आहे.
मोहम्मद सिराजने इंग्लडविरुद्ध कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट्स घेतल्या, पाचव्या सामन्यात त्याला मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीर घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे या कसोटीत त्याने एकूण 9 बळी घेतले. त्याला प्रसिद्ध कृष्णाने मोलाची साथ दिली आहे.

बुमराहच्या विक्रमाची बरोबरी
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम बुमराहने केला होता आणि आता मोहम्मद सिराजचे नावही या क्लबमध्ये समाविष्ट झाले आहे. सिराजने बुमराहची बरोबरी केली आहे. 2021-22 मध्ये जसप्रीत बुमराहनेही इंग्लंडमध्ये एकूण 23 बळी घेतले. आता मोहम्मद सिराज यानेही इंग्लडविरुद्धच्या सिरीजमध्ये सर्वाधिक 23 बळी घेत जसप्रित बुमराहच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
सिराज रथी महारथींसाठी ठरला कर्दनकाळ
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लाॅर्ड्सचे मैदान असो की, एजबेस्टन अथवा ओव्हल ..मोहम्म सिराजने भल्या-भल्या फलंदाजांना त्याच्या धारदार गोलंदाजीने तंबूत पाठवले आहे. मोहम्मद सिराजने चौथ्या डावात काही मोठ्या खेळाडूंना लक्ष्य केले. त्याने जॅक क्रॉली, ऑली पोप, जेमी स्मिथ, ओव्हरटन, गस अॅटकिन्सन सारख्या खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये धाडले. ओव्हलमध्ये कसोटीच्या चौथ्या डावात चार बळी घेणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. त्याच्या जवळपास दुसरा कोणताही खेळाडू नाही.पाच कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज सिराज ठरला असून या स्पर्धेत बुमराहनेही 14 बळी घेतले पण तो पूर्ण 5 सामने खेळला नाही.
मोहम्मद सिराज टाॅप 20 गोलंदाजातही नाही!
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी कसोटीच्या जागतिक क्रमवारीत नंबर-1 गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहचे रेटिंग 898 असून त्यानंतर दुसरा भारतीय रवींद्र जडेजा 14 व्या क्रमांकावर आहे. खास बाब म्हणजे मोहम्मद सिराज हा टाॅप गोलंदाजाच्या यादीत नाही तर तो सद्या 27 व्या स्थानावर आहे.
आयसीसीच्या टॉप-10 वेगवान गोलंदाजांची यादी-
1. जसप्रीत बुमराह- भारत
2. कागिसो रबाडा- दक्षिण आफ्रिका
3. पॅट कमिन्स- ऑस्ट्रेलिया
4. जोश हेझलवूड- ऑस्ट्रेलिया
5. नोमान अली- पाकिस्तान
6. स्कॉट बोलॅड- ऑस्ट्रेलिया
7. मॅट हेन्री- न्यूझीलंड
8. नाथन लायन- ऑस्ट्रेलिया
9. मार्को जॅन्सन- दक्षिण आफ्रिका
10.मिशेल स्टार्क- ऑस्ट्रेलिया












Click it and Unblock the Notifications