टीम इंडियाचं बळ दुप्पटीने वाढणार; कॅप्टन रोहितकडून मोठी अपडेट, मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध...
Border-Gavaskar Trophy- दुसऱ्या कसोटी टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. आता तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचं बळ दुप्पटीने वाढेल, अशी बातमी समोर येत आहे. पुढील सामने खेळण्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाला जावू शकतो. ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत, स्वतः कॅप्टन रोहित शर्माने याबाबतचे संकेत दिले आहेत.

रोहित शर्माची पत्रकार परिषद
टीम इंडिया सध्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. अॅडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव केला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने माध्यमांशी संवाद साधला. रोहितने या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. रोहितला मोहम्मद शमीबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रोहित शर्माने या मालिकेत शमी खेळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तो म्हणाला, त्याच्यासाठी भारतीय संघाचं दार खुलं आहे.
Rohit Sharma updates Mohammed Shami's fitness and his chances of playing in the latter stages of the series #AUSvIND pic.twitter.com/wNfi2e9Ho7
— 7Cricket (@7Cricket) December 8, 2024
काय म्हणाला रोहित शर्मा?
मोहम्मद शमी पुढच्या मॅचमध्ये खेळेल का, असा प्रश्न विचारल्यावर रोहित शर्मा म्हणाला, "निश्चित. शमीसाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले आहेत. आम्ही शमीकडे लक्ष ठेवून आहोत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत शमीच्या गुडघ्याला सूज आली होती. ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं होतं. आम्हाला शमीवर दबाव टाकायचा नाही. बीसीसीआयचं वैद्यकीय पथकही शमीवर लक्ष ठेवून आहे. शमी जे करतोय त्याकडे आमचं लक्ष आहे. त्यामुळे तो बरा झाला असेल तर नक्कीच टीम इंडियात पुढची मॅच खेळेल," अशी अपेक्षा रोहितनं व्यक्त केली.
मोहम्मद शमीबाबत अपेक्षा वाढल्या
एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यानंतर त्याला बंगळुरुतील एनसीएत पाठवलं जातं. नॅशनल क्रिकेट अँकेडमीत वैद्यकीय पथकाच्या निगराणीत या खेळाडूंना दुखापतीतून फिट करण्यासाठी प्रयत्न केले जातात. शमीवर सध्या तेथेच उपचार सुरु आहेत. आता त्याला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. त्या टेस्टमध्ये पास झाल्यास एनसीएकडून त्याला फिटनेस सर्टिफिकेट दिलं जाणार असून याच सर्टिफिकेटची भारतीय संघाला प्रतिक्षा आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शमी हा ऑस्ट्रेलियातील शेवटचे 2 कसोटी सामने खेळू शकतो. तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. शमी त्याआधी ब्रिस्बेनमध्ये पोहचेल असेही सांगितले जात आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.












Click it and Unblock the Notifications