Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs ENG: मोहम्मद शमी इतिहास रचण्यास सज्ज,2 विकेट घेताच तो दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील होणार

Mohammed Shami: एका वर्षापेक्षा जास्त काळ क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहिलेला मोहम्मद शमी अखेर टीम इंडियामध्ये परतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्या आगमनाने भारतीय संघ निश्चितच बळकट झाला आहे.

दरम्यान 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान दुखापत झालेला शमी एका वर्षापेक्षा जास्त काळ मैदानावर परतू शकला नाही. त्यामुळे फिटनेस परत मिळवण्यासाठी त्याने स्थानिक क्रिकेटचा आधार घेत तो यशस्वी झाला. तंदुरुस्तीनंतर निवडकर्त्यांनी त्याला परत संघात सहभागी करुन घेतलं आहे.

Mohammed Shami

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 22 जानेवारी रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. टी-20 मालिकेतील या पहिल्याच सामन्यात मोहम्मद शमीला इतिहास रचण्याची संधी आहे. या मालिकेत शम्मी गोलंदाजीत मोठी कामगिरी करू शकतो.

इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

फक्त दोन विकेट घेऊन तो दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवणार आहे. शम्मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. शमीने 64 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 229 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 101 सामन्यांमध्ये 195 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 23 टी-20 सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत.

कोलकाता टी-20 मध्ये 2 विकेट घेताच तो झहीर खान, अश्विन आणि अनिल कुंबळे या दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील होईल. सध्या त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 448 विकेट्स आहेत. आणखी दोन विकेट्स घेतल्यास त्याचा एकूण विकेट 450 होतील, हा पराक्रम फक्त काही भारतीयांनीच केला आहे. अशी कामगिरी करणारा शम्मी आठवा भारतीय गोलंदाज ठरेल.

अनिल कुंबळेचं नाव सर्वात वरच्या स्थानी

भारतीय संघाचा माजी खेळाडू अनिल कुंबळेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 953 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यानंतर अश्विनने 765 विकेट्स घेतल्या आहेत. हरभजन सिंगचे नाव तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 707 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.

भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप गोलंदाज

अनिल कुंबळे - 953 विकेट्स

आर. अश्विन - 765 विकेट्स

हरभजन सिंग - 707 विकेट्स

कपिल देव - 687 विकेट्स

रवींद्र जडेजा - 597 विकेट्स

झहीर खान - 597 विकेट्स

श्रीनाथ - 551 विकेट्स

मोहम्मद शमी - 448 विकेट्स

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+