'काहीही चुकीचे नाही,' मोहम्मद शमीने सानिया मिर्झाशी लग्नाच्या अफवांवर सोडले मौन
Sania Mirza Mohammed Shami Wedding Rumours : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोट घेतला आहे, तर दुसरीकडे टीम इंडियाचा स्टार मोहम्मद शमी देखील त्याची पत्नी हसीन जहाँपासून बराच काळ विभक्त आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या लग्नाबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एक विधान केलं आहे.

सानियाशी संबंधित अफवांवर शमीने मौन सोडलं
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने टेनिस स्टार सानिया मिर्झाशी संबंधित अफवांवर मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर अनेक पोस्ट्समध्ये शमी आणि सानिया लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. तसेच शमी आणि सानिया मिर्झाच्या फोटोत छेडछाड करुन एकत्र करण्यात आले होते.
अलीकडेच, यूट्यूबवर शुभंकर मिश्रा यांच्याशी बोलताना शमीला या अफवांवर विचारण्यात आले. त्यावेळी अशा बातम्या ऑनलाइन पसरवणाऱ्यांनाची शमीने चांगलीच शाळा घेतली.शमी म्हणाला की, असे मीम मनोरंजन करू शकतात, परंतु ते नुकसानदायक देखील असू शकतात.
सोशल मीडियावर जबाबदारीने वागावे
'मी सर्वांना विनंती करतो की, त्यांनी सोशल मीडियावर जबाबदारीने वागावे आणि अशा निराधार बातम्या पसरवण्याचे टाळावे.' अशा बातम्या आल्या तरी त्यावर प्रतिक्रिया देणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट नव्हती. शमी म्हणाला की, मी अशा बातम्या पाहायचो. पण मी त्याला महत्त्व देत नव्हतो. हिम्मत असेल तर व्हेरिफाईड अकाउंटवरून अशा पोस्ट शेअर करा मग मी सांगेन.
'मीम्सच्या नावाने अफवा पसरवणे चुकीचे आहे हे पूर्णपणे विचित्र आहे, यावर मी काय बोलू, मी असे म्हणू इच्छितो की, अशा खोट्या बातम्या पुढे आणू नयेत. मीम्स असावेत हे मला मान्य आहे, त्यात काही गैर नाही, पण चुकीच्या गोष्टींबद्दल अफवा पसरवणे चुकीचे आहे. मीम्स बनवणे चुकीची गोष्ट नाही, पण इतरांच्या आयुष्याबद्दल मीम्स बनवणे चुकीचे आहे. तुम्ही विचारपूर्वक मीम्स तयार केले पाहिजेत. तुमच्यात हिंमत असेल तर असे मीम्स तुमच्या व्हेरिफाईड अकाउंटवर शेअर करा, मग मी तुम्हाला सांगेन असं शमाने म्हटलं आहे












Click it and Unblock the Notifications