Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोहम्मद रिझवानच्या 'तस्बीह'चा व्हिडिओ व्हायरल; सुरेश रैनाने उडवली खिल्ली, म्हणाला- हे क्रिकेटर नाही

ICC Champions Trophy 2025 : मोहम्मद रिझवान आणि त्याच्या टीमसाठी कालचा दिवस अतिशय वाईट गेला. कारण, भारतीय संघाने त्यांना चांगलेच धुऊन काढले. टीम इंडियाने पाकिस्तानला सहा विकेट्सने हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या पाकिस्तानाच्या संधी धुळीस मिळवल्या.

खरे सांगायचे तर, भारताने तिन्ही विभागांमध्ये पाकिस्तानला पराभूत केले. अशातच कालच्या मॅच दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यामुळे मोहम्मद रिझवानची खिल्ली उडवली जात आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं काय घडलंय ते.

नेमकं काय घडलं?

काल भारत पाकिस्तान मॅच सुरू झाली. पाकिस्तानने सुरुवातीला बॅटिंग घेतली. काही खेळाडू मैदानात उतरले. तेव्हा पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान हा हातात माळ घेऊन अल्लाहची प्रार्थना करत होता. रिझवानच्या या कृतीकडे सर्वांचे लक्ष वेधले. खेळादरम्यान, रिझवान 'तस्बीह' करत नशीब बदलण्याची प्रार्थना करत होता. तसे झाले नाही, परंतु रिझवानच्या कृतीची खिल्ली उडवली गेली.

Champions Trophy 2025

सुरेश रैनानेही उडवली खिल्ली!

रिझवानच्या या कृतीला पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने त्याची खिल्ली उडवली. रैनाने दावा केला की भारताचा कर्णधार रोहित शर्मा देखील 'महामृत्युंजय मंत्र' देखील म्हणत असावा. रिझवानची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दोन पराभवामुळे पाक अडचणीत

सलग दोन पराभवांमुळे, पाकिस्तानची सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता जवळजवळ संपली आहे. आता त्यांना बाद फेरीत पोहोचण्यासाठी चमत्काराची आवश्यकता असेल. दुसरीकडे, भारताने स्वतःसाठी सेमीफायनलमध्ये स्थान मिळवणे जवळजवळ निश्चित केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+