Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोहम्मद सिराजने सर्वात फास्ट बॉल टाकला, अनेक महारथींचे रेकॉर्ड तोडले, खरच ही घटना घडली का?

Mohammed Siraj Fastest Ball IND vs AUS 2nd Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 मधील ॲडलेड येथील कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय संघासाठी निराशाजनक ठरला. टीम इंडिया अवघ्या 180 धावा करून ऑलआऊट झाली.

त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 गडी गमावून 86 धावा करून सामन्यावर पकड मजबूत केली होती. दरम्यान, दुसऱ्या कसोटीत भारतीय बॉलर मोहम्मद सिराज सर्वाधिक चर्चेत आला. अर्थात त्याचे कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

क्रिकेट जगतातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा शोएब अख्तरचा विक्रम मोडला. पण, यासंदर्भात काही चर्चा देखील आता होऊ लागल्या आहेत. खरच मोहम्मदने एवढ्या स्पीडने बॉल फेकला का?, स्पीडोमीटरमध्ये गडबड झाली का असे सवाल विचारले जात आहेत.

Mohammed Siraj

क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब अख्तरच्या नावावर आहे, ज्याने ताशी 161.3 किमी वेगाने गोलंदाजी केली. पण जेव्हा मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲडलेड कसोटीत गोलंदाजी करत होता तेव्हा त्याच्या एका चेंडूवरील स्पीडोमीटरने ताशी 181.6 किमीचा वेग दाखवला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही घटना ऑस्ट्रेलियन डावाच्या 24 व्या षटकात घडली.

कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची स्थिती चांगली आहे. टीम इंडिया अवघ्या 180 रन्सवर ऑलआऊट झाली, तर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 86 धावा केल्या होत्या आणि अजूनही त्यांच्या 9 विकेट्स शिल्लक होत्या. सध्या कांगारू संघ पहिल्या डावात 94 धावांनी मागे आहे. तर शनिवारी खेळाला सुरूवात झालेली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंक बॉल कसोटीच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना सिराज 24 वे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकात त्याच्या शेवटच्या चेंडूचा वेग रेकॉर्डब्रेक असल्याचे दाखवण्यात आले, जे पाहून सर्वांचे मन हेलावले. चेंडूचा वेग 181.6 किमी/तास दाखवण्यात आला, जो क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडूचा वेग आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+