इंग्लंडमध्ये मोहम्मद सिराजचा सर्वात मोठा विक्रम! एकाही गोलंदाजाला अशी कामगिरी जमली नाही...
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताला शानदार पुनरागमन करून दिले. या कामगिरीदरम्यान, त्याने असा एक विक्रम रचला आहे, जो या मालिकेतील अन्य कोणत्याही गोलंदाजाला करता आलेला नाही.

इंग्लंडने दुसऱ्या दिवशी दमदार सुरुवात करत 92 धावांची सलामी दिली होती. त्यांची फलंदाजीची लय पाहता, ते पुन्हा एकदा 500 धावांचा टप्पा पार करतील असे वाटत होते. मात्र, मोहम्मद सिराजने आपल्या अचूक माऱ्याने इंग्लंडच्या फलंदाजांना रोखले आणि त्यांना 400 धावांचा टप्पाही गाठू दिला नाही.
सिराजने इंग्लंडचा हंगामी कर्णधार ऑली पोप (22 धावा) याला बाद केले. त्यानंतर त्याने सर्वात महत्त्वाचा फलंदाज जो रूट (29 धावा) याला लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रूट एकदा सेट झाला की मोठी धावसंख्या उभारतो, हे सर्वांना माहीत आहे. मात्र, सिराजने त्याला लवकर बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर त्याने जेकब बेथेलला (6 धावा) सुद्धा बाद केले. अशाप्रकारे, सिराजने अवघ्या सात षटकांत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
सिराज इथेच थांबला नाही. त्याने हॅरी ब्रुक्सचीही महत्त्वाची विकेट मिळवली, ज्यामुळे इंग्लंडचा डाव 247 धावांवर संपुष्टात आला. या मालिकेतील सर्वात जास्त विकेट्सचा विक्रम आता सिराजच्या नावावर आहे. त्याने या मालिकेत एकूण 18 विकेट्स घेतल्या आहेत, जो यापूर्वी बेन स्टोक्सच्या नावावर होता. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत सर्वाधिक बळी घेण्याचा हा विक्रम आता मोहम्मद सिराजच्या नावावर नोंदवला गेला आहे, ज्यामुळे भारताला सामन्यात पुन्हा वर्चस्व मिळवता आले.












Click it and Unblock the Notifications