मोहम्मद सिराज बनला DSP; जाणून घ्या, देशातील कोणकोणत्या खेळाडूंना मिळाली थेट पोलिसांत नोकरी
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची तेलंगणा सरकारने डीएसपी म्हणून नियुक्ती केली आहे. शुक्रवारी तेलंगणाचे पोलीस महासंचालक (डीजीपी) यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. भारतीय क्रिकेट खेळामध्ये त्याची कामगीरी पाहता तेलंगणा सरकारने मोहम्मद सिराजचे कौतुक करत थेट नियुक्ती दिली आहे. दरम्यान, यापूर्वी बॉक्सर निखत जरीनचीही डीएसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निखत या
दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिल्या आहेत. दरम्यान, सिराज यांची पोलिस विभागात करण्यात आलेली थेट नियुक्तीनंतर देशातील कोणकोणत्या खेळाडूंना थेट पोलिस विभागात नोकरीचा मान देण्यात आला यावर आपण जाणून घेणार आहोत.

राज्यसरकारने केली होती घोषणा!
या वर्षी भारताने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रिवंत रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना सिराजला सरकारी नोकरी देण्याचे आणि भूखंड देण्याचे आदेश दिले होते.
T-20 विश्वचषक 2024 मध्ये तीन सामने खेळले
मोहम्मद सिराज 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून तीन सामने खेळला होता. त्याला आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात केवळ 1 विकेट मिळाली. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने 25 तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 19 धावा दिल्या होत्या.
बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात सिराजला विश्रांती
बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतून सिराजला विश्रांती देण्यात आली होती. या मालिकेतील अंतिम सामना शनिवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.त्यांच्या जागी मयंक यादव आणि हर्षिता राणा यांना संघात स्थान देण्यात आले. तर सिराजने बांगलादेशविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 4 विकेट घेतल्या होत्या.
मोहम्मद सिराजची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
30 वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भारतासाठी आतापर्यंत 28 कसोटी, 44 एकदिवसीय आणि 16 टी-20 सामने खेळले आहेत. सिराजच्या नावावर कसोटीत ७६, वनडेत ७१ आणि टी-२०मध्ये १४ बळी आहेत. त्याने आयपीएलमध्ये खेळलेल्या 93 सामन्यात 93 बळी घेतले आहेत.
पोलिस सेवेतील प्रमुख खेळाडू
1) जोगिंदर शर्मा (क्रिकेटर)
डीएसपी, हरियाणा,
2) हिमा दास (ॲथलीट)
डीएसपी, आसाम,
3) लोव्हलिना बोर्गोहेन (बॉक्सर)
डीएसपी, आसाम,
4) निखत जरीन (बॉक्सर)
डीएसपी, तेलंगणा,
5) मोहम्मद सिराज (क्रिकेटर)
डीएसपी, तेलंगणा,












Click it and Unblock the Notifications