"जब लात पडने वाली हो तो संन्यास!.." धोनीच्या निवृत्ती बद्दल मोहम्मद शमीचा मोठा खुलासा
भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीने 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.गेल्या आयपीएल मध्ये ही चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले नव्हते.धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाड याने कर्णधार पद स्वीकारले होते.मात्र त्यानंतरही तो आयपीएलमध्ये धोनीचा सहभागी होत राहिला. आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे की धोनी कधी निवृत्ती घेणार आहे?
एमएस धोनी आयपीएलमधून निवृत्ती कधी जाहीर करणार? हा एक प्रश्न आहे, ज्याचे उत्तर अजून मिळायचे आहे. माहीने ऑगस्ट 2020 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला अलविदा केला होता. पण तो आयपीएलमध्ये सीएसकेसाठी खेळत आहे.

धोनी आयपीएल 2024 चा हंगामा सुरु होण्यापूर्वीपर्यंत धोनी निवृत्त होईल अंदात वर्तवला होता. मात्र, धोनीने हा हंगामही खेळताना दिसला. त्यामुळे माही कधी निवृत्त होणार या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. आता धोनीच्या निवृत्तीच्या प्लॅनबद्दल वेगवान गोलंदज मोहम्मद शमीने खुलासा केला आहे.
मोहम्मद शमीचा धोनीच्या निवृत्तीचा खुलासा..
मोहम्मद शमी मीडियाशी बोलताना म्हणाले, तुम्ही त्याच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लावत आहात. तो माणूस स्वत: म्हणतोय वेळ आल्यावर सांगेन. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही सारखा विचारु नये. याबाबत माही भाईशी माझी चर्चा झाली आहे. ज्यामध्ये मी विचारले होते की खेळाडूने कधी निवृत्ती घ्यावी? यावर तो म्हणाला, एक म्हणजे जेव्हा तुम्हाला स्वतःला कंटाळा आल्यावर आणि दुसरे म्हणजे, जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्हाला लाथ मारली जाईल म्हणजे जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला संघातून वगळण्यात येईल तेव्हा निवृत्ती घ्यावी.
मोहम्मद शमी पुढे म्हणाला,पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही खेळाचा आनंद घेणे थांबवता, तेव्हा तुमचीवेळ आल्याचे लक्षण आहे. निवृत्तीसाठी सर्वोत्तम वेळ निवडल्यास ते अधिक चांगले होईल. कारण तुम्ही विशिष्ट स्वरूप राखू शकत नसल्यास तुमचे शरीर तुम्हाला संकेत देण्यास सुरुवात करते. हीच वेळ आहे जेव्हा खेळाडूने त्याच्या निवृत्तीची वेळ मानली पाहिजे.












Click it and Unblock the Notifications