IPL 2025 Points Table: MI च्या विजयाने पॉइंट टेबलमध्ये मोठे फेरबद्दल, ऑरेंज, पर्पल कॅप कोणाकडे ?
IPL 2025 Points Table: आयपीएल 2025 च्या 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) ला चार विकेट्सने पराभूत करून त्यांची पराभवाची मालिका मोडीत काढली आहे. ज्यामुळे आता पॉइंट टेबलमधील बरेच बदल झाले आहेत. हा सामना 17 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांपैकी तीन विजय आणि चार पराभवांसह संघाने 6 गुण मिळवले आहेत. त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबाद पॉइंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. आतापर्यंत सात सामन्यांतून दोन विजय आणि पाच पराभवांसह 4 गुण मिळवले आहेत. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबल आणि पर्पल, ऑरेप कॅफमध्ये कोणते बदल झाले आहेत ते जाणून घेऊया

MI विरुद्ध SRH सामन्यानंतर अपडेट पॉइंट्स टेबल
दिल्ली कॅपिटल्स (DC): संघाने आतापर्यंत 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्यांचा संघ 10 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. मागील सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवामुळे त्यांची विजयी मालिका खंडित झाली आहे.
गुजरात टायटन्स (GT): गुजरात टायटन्सने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. हा संघ 8 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रन रेट +1.081 आहे, जो इतर संघांपेक्षा जास्त आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB): आरसीबीने 6 पैकी 4 सामने जिंकून 8 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट +0.672 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पंजाब किंग्ज (PBKS): पंजाबने 6 पैकी 4 सामने जिंकून 8 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट +0.172 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
लखनऊ सुपर जायंट्स (LSG): लखनऊने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. त्याना 8 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट +0.086 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
कोलकाता नाईट रायडर्स (KKR): केकेआरने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत .त्यांना 6 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट +0.547 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे.
मुंबई इंडियन्स (MI): मुंबईने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत.त्यांना 6 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट +0.239 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ सातव्या क्रमांकावर आहे.
राजस्थान रॉयल्स (RR): राजस्थानने 7 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यांना 4 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट -0.714 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ आठव्या क्रमांकावर आहे.
सनरायझर्स हैदराबाद (SRH): SRH ने 7 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यांना 4 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट -1.217 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ नवव्या क्रमांकावर आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK): CSK ने 7 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यांना 4 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट -1.276 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे.
सूर्यकुमार यादवची ऑरेंज कॅपच्या यादीत झेप
मुंबई इंडियन्सचा दिग्गज फलंदाज सूर्यकुमार यादवने ऑरेंज कॅपच्या यादीत झेप घेतली आहे. कालच्या सामन्यापूर्वी, सूर्या ऑरेंज कॅप टेबलमध्ये सहाव्या स्थानावर होता. मात्र कालच्या सामन्यात सूर्याने 26 धावांची खेळी करुन त्याच्या एकूण 265 धावा झाल्या आहेत. ज्यामुळे तो ऑरेंज कॅपच्या यादीत तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे..
IPL Orange Cap 2025: ऑरेंज कॅप कोणाकडे आहे ?
पीबीकेएस विरुद्ध केकेआर सामन्यानंतर ऑरेंज कॅप लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू निकोलस पूरनकडे आहे. त्याने 7 डावांमध्ये 357 धावा केल्या आहेत. दुस-या क्रमांक गुजरात टायटन्सचा खेळाडू साई सुदर्शन आहे, साईने 329 धावा केल्या आहेत. तिसरा क्रमांक मिचेल मार्शचा आहे. त्याने आयपीएलच्या या सीझनमध्ये 295 धावा केल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा दिग्गज खेळाडू सु्र्याकुमार यादव झेप घेतली आहे. त्याने 265 धावा केल्या आहेत.
IPL 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज
निकोलस पूरन (LSG)- 357
साई सुदर्शन (GT) - 329
मिचेल मार्श (LSG) - 295
सुर्यकुमार यादव (MI)- 265
श्रेयस अय्यर (PBKS)- 250
IPL Purple Cap 2025: पर्पल कॅप कोणाकडे आहे ?
चेन्नई सुपर किंग्जचा फिरकी गोलंदाज नूर अहमदकडे सध्या पर्पल कॅप आहे. नूर अहमदने 7 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत.दुस-या क्रमांकावर सीएसकेचा खलील अहमद आहे, त्याने 11 विकेट घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा पर्पल कॅपच्या यादीत स्थान मिळवलं आहे. पंड्याने आयपीएल 2025 मध्ये 6 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. पंड्याला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एक विकेट मिळाली. यासह, तो पर्पल कॅपच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत नूर अहमद पहिल्या क्रमांकावर आहे.
पर्पल कॅपच्या शर्यतीत असलेल्या टॉप 5 गोलंदाज
नूर अहमद (CSK)- 12
कुलदीप यादव (DC)- 11
खलील अहमद (CSK)- 11
हार्दिक पांड्या (MI)- 11
शार्दुल ठाकूर (LSG)- 11
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications