MI vs RCB : जसप्रित बुमराह विराटमध्ये टशन! कुणी दिला कुणाला धक्का, मुंबई बंगळुरू मॅचमध्ये काय घडलं?
MI vs RCB : काल 7 मार्च 2025 झालेला मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर बंगळुरू सामना अत्यंत रोमहर्षक स्थितीत पोहचला होता. या सामन्यात अखेर बारा धावांनी राॅयल चॅलेंजर बंगळुरूने बाजी मारली. या सामन्यात खेळाडूंमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. जसप्रित बुमराह आणि विराट कोहलीत रंगलेलं टशन आता समोर आले आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
विराट कोहलीने मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करत 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. वेगवान आणि फिरकी गोलंदाजीविरूद्ध विराटने आपला जोर लावला आणि बहारदार खेळ केला. या खेळीने विजय तर साकार केलाच पण विराटने आपल्या अर्धशतकासह एक नवा विक्रमही रचला.

विराटने पहिल्याच षटकात लगावला षटकार
विराट कोहली या सामन्यात मोठा खेळ करणार ही बाब त्याची देहयष्टीच सांगत होती. कमालीचा आत्मविश्वास तो खेळताना दिसत होता. पुनरागमन करणाऱ्या जसप्रित बुमराहने जेव्हा गोलंदाजी केली तेव्हा त्याच्या आयपीएल 2025 मधील पहिल्याच षटकात विराट कोहलीने एक दणदणीत षटकार लगावला.
Jaspreet Bumrah and Virat Kohli having fun on the ground ❤️#RCBvsMI #MIvsRCB pic.twitter.com/RiZyDjivOB
— Lol Factory (@Prithviraj23239) April 7, 2025
जसप्रित बुमराह विराटमध्ये काय घडलं?
आपल्या खेळीदरम्यान विराट कोहलीने जसप्रित बुमराहबरोबर अशी गोष्ट केली की, आधी सर्वांच्याच भुवया उंचावल्या व त्यानंतर अनेकांना हायसे वाटले. या कृत्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या खेळीदरम्यान विराट कोहलीने बुमराहला धक्का दिला.
The Virat Kohli and Jasprit Bumrah moment at the Wankhede. 🐐❤️pic.twitter.com/yNeMK7ZIpw
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 7, 2025
विराटने धक्का दिल्यानंतर बुमराहची प्रतिक्रीया काय?
- 11 व्या षटकात बुमराह गोलंदाजी करत होता. त्यावेळी विराट आणि रजत पाटीदार फलंदाजी करत होते. बुमराहने या षटकात फक्त सिंगल सिंगल धाव काढण्याचीच दोघांना संधी दिली.
- बुमराहने पाचवा चेंडू रजत पाटीदारला टाकला आणि त्याने फटका मारलेला चेंडू बुमराहने लगेच पकडला. यानंतर बुमराहने नाॅन स्टाईकर एंडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला ती केवळ अॅक्शन होती, चेंडू मात्र बुमराहच्या हातातच होता.
- तोपर्यंत विराट त्याच्या जागेवर जाऊन उभा होता. विराटनेही हे पाहिले आणि बुमराह हसत हसत पुन्हा माघारी जात होता. तितक्यात विराटने त्याच्याकडे बघत त्याला धक्का मारला.
- दरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये एक खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळाला. विराट आणि बुमराह एकमेकांशी बोलताना हसताना दिसले. तर विराटनेही हसत हसत त्याला धक्का दिला.












Click it and Unblock the Notifications