Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मैदानातच आनंदाश्रू; १७ वर्षांच्या 'या' खेळाडूची बॅटींग बघून त्याचा लहान भाऊ मैदानात रडला, पहा Video

चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यांत काल आयुष म्हात्रेला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. आपल्या प्रदार्पणाच्या सामन्यातच त्याने चार चौकार व दोन षटकारांच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली. आपल्या छोट्याशा खेळीत त्याने १५ चेंडूत ३२ धावा ठोकल्या. आयुष हा मुंबईचाच असल्याने आज घरच्या मैदानावर त्याने चाहत्यांना खूष केले. आयुषचा खेळ पाहून स्टेडिआममध्ये असणारा त्याचा छोटा भाऊ अक्षरशः रडला. त्याचे अश्रुही या सामन्यांत चर्चेचा विषय ठरले.

Ayush Mhatre Brothers Video

आयुषचे दमदार प्रदार्पण

आयुष म्हात्रे हा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. पदार्पणाच्या दिवशी तो फक्त १७ वर्षे आणि २७८ दिवसांचा होता. दीपक चहरने बाद करण्यापूर्वी आयुषने १५ चेंडूत ३२ धावा केल्या. चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक झाले. हा १७ वर्षीय खेळाडू मूळचा मुंबईचा असल्याने आणि स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांच्याकडून खेळत असल्याने त्याचे हे घरच्या मैदानावरील पदार्पण मुंबईकरांसाठी पर्वणीच ठरले.

सीएसकेचे सर्वात तरुण खेळाडू

१७ वर्षे २७८ दिवस - आयुष म्हात्रे विरुद्ध एमआय, वानखेडे, २०२५
१८ वर्षे १३९ दिवस - अभिनव मुकुंद विरुद्ध आरआर, चेन्नई, २००८
१९ वर्षे १२३ दिवस - अंकित राजपूत विरुद्ध एमआय, चेन्नई, २०१३
१९ वर्षे १४८ दिवस - मथिशा पाथिराणा विरुद्ध जीटी, वानखेडे, २०२२

भावाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल

आयुष म्हात्रेने प्रदार्पणाच्या सामन्यांतच मुंबईकरांची मने जिंकली. तो फलंदाजी करताना मोठे फटके मारत होता. तेव्हा त्याचा धाकटा भाऊही स्टेडियममध्ये उपस्थित होता. प्रेक्षकांच्या उत्साहात आयुषचा धाकटा भाऊ भावनेने रडताना दिसला. चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

कोण आहे आयुष म्हात्रे?

आयुष म्हात्रे हा उजव्या हाताचा टॉप ऑर्डर फलंदाज आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये ते मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. अवघ्या १७ वर्षे आणि २७८ दिवसांच्या वयात त्याने चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. पिवळी जर्सी घालणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रम त्याने केला. त्याच्या पहिल्या डावात त्याने १५ चेंडूत ३२ धावा केल्या. आयपीएलपूर्वी म्हात्रे यांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये ४५८ धावा आणि रणजी ट्रॉफीमध्ये ४७१ धावा केल्या. ज्यामध्ये तीन शतकांचा समावेश होता. त्याने ९ प्रथम श्रेणी आणि सात लिस्ट ए सामने खेळले आणि सर्व फॉरमॅटमध्ये जवळपास १००० धावा केल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+