युवराज सिंगने 7 षटकार ठोकले! सचिनही चमकला! मास्टर्स लीगमध्ये ऑस्ट्रेलियाची हार, भारत फायनलमध्ये
IND Vs AUS Yuvraj singh 7 sixes In Masters League : भारताचा लढवय्या फलंदाज असलेला युवराज सिंग षटकाराचा बादशहा म्हणून ओळखला जातो. आपल्या नयनरम्य फटक्यांनी त्याने आपल्या कारकिर्दीत क्रीडाप्रेमींना मनमुराद आनंद दिला एवढेच नाहीतर पराभवाच्या छायेतील सामने जिंकून विरोधी टीमच्या तोंडचा विजयाचा घासही पळवणारा अफलातून फलंदाज.
इंटरनॅशनल मास्टर लीग स्पर्धेत सेमीफायनलचा सामना 13 मार्च 2025 रोजी झाला. या सामन्यात त्याने बहारदार फलंदाजी केली. तो काळ आठवत असेलच, जेव्हा 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने ज्या प्रकारे षटकारांचा वर्षाव केला.. तो कोण विसरू शकेल. आज पुन्हा एकदा युवीची तीच झलक पाहायला मिळाली आणि त्याने होळीपूर्वी षटकार ठोकून भारतीयांना मोठी भेट दिली.

इंटरनॅशनल मास्टर्स लीगच्या अंतिम सामन्यात इंडिया मास्टर्सने ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. युवराज सिंगची झंझावाती खेळी पाहायला मिळाली. त्याच्या आधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बॅटही बोलली.
गोलंदाजीचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम खेळण्यास पाचारण केले आणि अंबाती रायडू 4 धावांवर बाद झाला. यानंतर पवन नेगीही 14 धावा करून निघून गेला. यावेळी सचिन तेंडुलकर दुसऱ्या टोकाला समर्थपणे बाजू सांभाळत होता. त्याने 30 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 40 धावा केल्या.
युवराज सिंगची तुफान फटकेबाजी
यानंतर युवराज सिंग नावाचे वादळ आले आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना आपला झंझावात दाखवून दिला. जुन्या आठवणींना उजाळा देत त्याने धमाका केला आणि स्लॉग स्वीपसह सहा षटकार ठोकले. सरळ षटकार खेळला आणि तेव्हा तरुण युवराजची आठवण झाली. युवराजने 30 चेंडूत 7 षटकार आणि 1 चौकार मारून 59 धावांची खेळी केली. स्टुअर्ट बिन्नीने 36 आणि युसूफ पठाणने 21 धावा करत भारताचा डाव 7 विकेटच्या मोबदल्यात 220 पर्यंत नेला.
इंडिया मास्टर्स 220/7 (युवराज सिंग 59, सचिन तेंडुलकर 42, स्टुअर्ट बिन्नी 36; झेवियर डोहर्टी 2/30, डॅनियल क्रिश्चियन 2/40)
ऑस्ट्रेलिया मास्टर्स 126 सर्वबाद (बेन कटिंग 39, नॅथन रीअर्डन 21; शाहबाज नदीम 4/1, कुमार 4/1, नाथन रीअर्डन 4/1, शाहबाज नदीम 4/1, 1/1) 2/31












Click it and Unblock the Notifications