Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

20 वर्षांचा संसार संपला, मेरी कोमचा घटस्फोट; कोण आहे हितेश चौधरी ज्याच्यासोबत नाव जोडले जातेय?

भारतीय बॉक्सर आणि ऑलिंपिक पदक विजेती खेळाडू एम. सी. मेरी कोमने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दलच्या अफवांना पूर्णविराम दिला. तिने तिचा पती ओंखोलर कोम याच्याशी घटस्फोट घेतल्याचे स्पष्ट केले. त्यांचे वकील रजत माथूर यांच्यामार्फत प्रसिद्ध केलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, दोघांनी २० डिसेंबर २०२३ रोजी कोम प्रथा कायद्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता.

Mary Kom s affair with Hitesh Chaudhary

काय होत्या चर्चा?

मेरी कोम आणि तिचा पती ओंखोलर हे फक्त वेगळे झाले आहेत, त्यांची घटस्फोटाची कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही असा दावा करणाऱ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये सुरु होता. मेरी कोमचे नाव हितेश चौधरीशी जोडण्यात आले होते. परंतु या अफवा असून आमच्यात कोणतेही वैयक्तिक संबंध नसल्याचे मेरी कोमच्या वकिलांनी प्रसिद्ध केलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

कसे ताणले संबंध?

काही वृत्तानुसार, मेरी कोम आणि तिचे पती करूंग ओनलर काही काळापासून वेगळे राहत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार २०२२ च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत ओनलरचा पराभव झाल्यानंतर त्यांच्यातील अंतर वाढू लागले. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या नात्यात भावनिक आणि आर्थिक ताण येऊ लागला. हे दोघेही वेगळे रहायला गेल्यावर मेरी कोम तिच्या चार मुलांसह फरिदाबादला राहायला गेली. ओन्लर त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांसह दिल्लीत राहत आहे. या अंतरामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या अटकळांमध्ये आणखी वाढ झाली आहे.

कोण आहे हितेश चौधरी?

मेरी कोमचे हितेश चौधरी यांच्यासोबत अफेअर आहे, अशा चर्चा सुरु होत्या. चौधरी हे मेरी कोम बॉक्सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आणि दोघांमध्ये फक्त व्यावसायिक संबंध आहेत, असे मेरी कोम यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. हितेश चौधरी यांना एक व्यावसायिक आणि क्रीडा व्यक्ती म्हणूनही ओळखले जाते. ते मेरी कोम फाउंडेशनचे अध्यक्ष आणि एमसी मेरी कोम डॉट कॉमचे व्यवसाय भागीदार देखील आहेत. हितेश चौधरीने त्याच्या इंस्टा अकाउंटवर मेरी कोमसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हितेश चौधरी यांची पत्नीही बाँक्सर आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+