रातोरात विनेशचं 300 ग्रॅम वजन कसं वाढलं? अपात्रतेवरुन संसदेत क्रीडा मंत्री मांडविय यांचं निवेदन
paris olympics 2024 vinesh phogat news : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या महिलांच्या 50 किलो कुस्तीच्या अंतिम फेरीत विनेश फोगटच्या अपात्रतेमुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. राजकारण्यांनी बुधवारी कुस्तीपटूला पाठिंबा दर्शवला आणि सांगितले की, संपूर्ण देशाला विनेश फोगटचा अभिमान आहे. त्याचवेळी संसदेतही फोगट यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले.
केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, आज विनेशचे वजन 50 किलो 100 ग्रॅम असल्याचे आढळून आले आणि तिला अपात्र घोषित करण्यात आले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे तीव्र निषेध नोंदवला आहे.

मांडविया पुढे म्हणाले की ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा पॅरिसमध्ये आहेत, पंतप्रधान त्यांच्याशी बोलले त्यांना विनेश प्रकरणी आवश्यक कारवाई करण्यास सांगितले आहे. सरकारने तिला वैयक्तिक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. विनेशला सर्व प्रकारची मदत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विनेशला चांगले प्रशिक्षक दिले. प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
अमित शहांचा फोगटला पाठींबा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विनेश फोगट यांना पाठिंबा दिला आणि सांगितले की, ऑलिम्पिकमधील फोगटच्या पराभवामुळे कोट्यवधी भारतीयांच्या आशा नक्कीच भंगल्या आहेत. शाह यांनी ट्विटरवर लिहिले की, विनेश फोगटच्या ऑलिम्पिकमधील अपात्रतेमुळे कोट्यवधी भारतीयांच्या मन उदास झालं आहे. विश्वविजेत्या खेळाडूंना पराभूत करण्याचा त्यांचा पराक्रम ही गौरवाची बाब असून तिची क्रीडा कारकीर्द चमकदार राहिली आहे. हे दुर्दैव केवळ तिच्या गौरवशाली कारकिर्दीला अपवाद ठरलं पण मला खात्री आहे की ती परत चांगला खेळ करुन नेहमीच विजेती असेल.अचानक वजन
100 ग्रॅम वजन कसे वाढले?
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विनेश फोगाटसंदर्भात वक्तव्य केले, ते म्हणाले की, विनेश फोगाटची गत काही दिवसांतील कामगिरी अत्यंत चांगली होती. मग अचानक तिचे वजन 50-100 ग्रॅम कसे वाढले? असा सवाल उपस्थित केला. जिंकून मायदेशी आली असती, तर तिला काही दिवसांपूर्वी जी वागणूक मिळाली होती, तिने जे आंदोलन केले होते, ते आठवून आपल्याविरोधात लाट निर्माण होईल असे कुणाला वाटले होते का? यामागे काहीतरी षडयंत्र असू शकते का? याचा विचार आपण केला पाहिजे.
रात्रभर वजन कसे वाढले? WFI चा प्रश्न
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष संजय सिंह म्हणाले की, आपल्या देशासाठी हे अत्यंत दुर्दैवी आहे की इतके चांगली कुस्ती करून अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यानंतरही विनेशला 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आले.
भारत सरकारने विनेश फोगटला तिचे प्रशिक्षक, पोषणतज्ञ आणि फिजिओ प्रदान केले आहेत. हे सर्वजण क्रीडाग्राममध्ये तिच्यासोबत आहेत, तिचे वजन 2 दिवस स्थिर होते परंतु रातोरात वाढले, याचे कारण फक्त तिचे पोषणतज्ज्ञ आणि प्रशिक्षकच सांगू शकतील.












Click it and Unblock the Notifications