महेंद्र सिंह धोनीने अनंत-राधिकासाठी लिहिली भावनिक पोस्ट, दिला महत्वाचा सल्ला
मुंबई : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला हजेरी लावली आणि दोघांचेही मनापासून अभिनंदन केले आहे. मुंबईत या भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत उपस्थित होता. माहीने सोशल मीडियावर फोटोसोबत अभिनंदनाची पोस्ट शेअर केली आहे, जी हृदयस्पर्शी आहे.

आठवडाभर चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकारणी आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींसह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. WWE कुस्तीपटू जॉन सीना, गायक जस्टिन बीबर आणि ॲडेल यांसारखे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
एमएस धोनीचा संदेश
धोनीने इन्स्टाग्रामवर नवविवाहित जोडप्यासाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. धोनीने लिहिले, "राधिका, तुझे तेजस्वी हसू सदैव असचं राहू दे ! अनंत, तू तुझ्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येकाला प्रेमाने वागवतोस. तितक्याच प्रेमाने आणि काळजीने राधिकाचा सांभाळ कर, तिची काळजी घे. तुमचं वैवाहिक जीवन आनंदाने, हास्याने आणि साहसाने भरलेलं असावं. अभिनंदन आणि लवकरच भेटू!"
साक्षी धोनीनेही सोशल मीडियावर तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले, "राधिका आणि अनंत, तुमच्या लग्नाबद्दल अभिनंदन! राधिकाचे स्मित हसू आणि अनंतच्या दयाळू हृदयाप्रमाणे तुमचे प्रेम सदैव तेजस्वी राहो. तुम्हा दोघांचे आयुष्य आनंद, हसू आणि साहसाने भरलेले जावो. तुम्हाला धोनी कुटुंबाकडून शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम"
लग्न सोहळ्याला हे खेळाडू उपस्थितीत होते
या लग्न सोहळ्याला अनेक भारतीय क्रिकेटपटूही उपस्थित होते. हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर यांच्यासह अनेक खेळाडू उपस्थित होते. आपल्या भव्यदिव्यतेमुळे हे लग्न सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही शनिवारी या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले.
लग्नात सहभागी झाल्यानंतर अनंत अंबानी यांनी शाहरुख खान आणि त्याच्या अनेक जवळच्या मित्रांना महागड्या भेटवस्तू दिल्या. रिपोर्ट्सनुसार, त्याने आपल्या पाहुण्यांना 2 कोटी रुपयांचे घड्याळ भेट दिले. या लग्नाचा खर्च 5000 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications