IPLचा वर्ल्ड कपवर डंका! 2024मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेले गेम कोणते, जाणून घ्या लिस्ट
Year Ender 2024, Sports Events on Google : संपूर्ण भारतवर्षात 2024 हे वर्ष क्रिकेट विश्वासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. कारण, भारताने जवळपास 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. एकीकडे सर्वाधिक आनंदाची बातमी असताना देखील 2024 मध्ये भारतात गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धेचे नाव T20 वर्ल्डकप नव्हते. या वर्षी भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेला गेम म्हणजे आयपीएल. अर्थात गुगल सर्चवर सर्वाधिक डंका राहिला तो आयपीएलचाच. परिणामी आयपीएलची क्रेझ कायम असल्याचे पाहायला मिळाले.
आयपीएल ही भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आहे. आयपीएलची क्रिकेट चाहत्यांमध्ये नेहमीच जबरदस्त क्रेझ राहिली आहे. आयपीएलमध्ये विविध देशांतील अनेक मोठे स्टार्स, रोमांचक सामने आणि उच्च-स्कोअरिंग खेळ इतर स्पर्धांपेक्षा वेगळे करतात.

टी-20 वर्ल्ड कपपेक्षा IPLचे पारडे जड होते
T20 विश्वचषक 2024 च्या विजयानंतरही, IPL ची लोकप्रियता आणि Google वरील त्याच्या शोध ट्रेंडने हे स्पष्ट केले की भारतात IPL बद्दलचे प्रेम आणि उत्कटता अजूनही खूप जास्त आहे. 2024 च्या क्रीडा स्पर्धांमध्ये T20 विश्वचषकाला दुसरे स्थान मिळाले. प्रदीर्घ कालावधीनंतर यंदाच्या विश्वचषकाची ट्रॉफी जिंकण्यात भारताला यश आले. पण त्यानंतर आयपीएलवर टी-20 विश्वचषकाची छाया पडली.
केकेआरने विजेतेपद पटकावले होते
यावर्षी आयपीएल 2024 चे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सने जिंकले. केकेआरने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकली. या विजयात प्रशिक्षक गौतम गंभीरचाही महत्त्वाचा वाटा होता. भारतात, 2024 च्या अखेरीस Google वर स्पोर्ट्स इव्हेंट्सच्या सर्च ट्रेंडमध्ये IPL पहिल्या क्रमांकावर राहिले. भारतात क्रिकेटचा दबदबा अजूनही मजबूत आहे, परंतु फुटबॉल आणि कबड्डी सारखे खेळ देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत.
सर्वाधिक शोधलेल्या खेळांची यादी
1.इंडियन प्रीमियर लीग
2.T-20 विश्वचषक
3.ऑलिंपिक
4.प्रो कबड्डी लीग
5.इंडियन सुपर लीग
6.महिला प्रीमियर लीग
7.कोपा अमेरिका
8.दुलीप ट्रॉफी
9.UEFA युरो
10.19 वर्षाखालील विश्वचषक












Click it and Unblock the Notifications