IPL Auction 2025: या विकेटकिपरवरही पैशांचा पाऊस पडेल, सर्व विकेटकिपरांची यादी येथे पहा
IPL 2025 mega auction wicketkeeping options: IPL 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या लिलावात अनेक दिग्गज विकेटकिपर ही सहभागी होत आहेत. आम्ही तुम्हाला अशा पाच विकेटकिपर बद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो. या यादीत इंग्लंडचा जोस बटलर पाचव्या स्थानावर आहे. लिलावापूर्वी बटलरला राजस्थान रॉयल्स संघाने रिलीज केलं आहे.
क्विंटन डी कॉकवर लक्ष असेल
क्विंटन डी कॉकने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना चमकदार कामगिरी केली आहे. त्याने गेल्या तीन मोसमात 900 हून अधिक धावा करून आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवले आहे. पॉवरप्लेमध्ये डी कॉकची आक्रमक फलंदाजी क्षमता त्याला खास बनवते. त्याची वेगवान सुरुवात आणि मोठे फटके मारण्याची क्षमता संघासाठी महत्त्वाची ठरली आहे.

इशान किशनवर पैशांचा पाऊस पडणार ?
इशान किशनने आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याने गेल्या तीन मोसमात 1192 धावा करून आपली गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली आहे. त्याची फलंदाजीची शैली तर वेगवान आहेच, पण सामन्याला कलाटणी देण्याची क्षमताही त्याच्यात आहे. अशा स्थितीत लिलावात त्यांच्यावर पैशांचा वर्षाव होऊ शकतो.
ऋषभ पंत इतिहास घडवणार?
ऋषभ पंतने भारतीय संघात आपली खास ओळख निर्माण केली आहे. पंतचा T-20 क्रिकेटमध्ये 148.93 चा सर्वोत्तम स्ट्राइक रेट असून 3284 पेक्षा जास्त धावा आहेत, ज्यामुळे तो कोणत्याही सामन्यात गेम चेंजर ठरतो. पंतची आक्रमक फलंदाजीची शैली आणि धावा करण्याची क्षमता विरोधी संघांसाठी धोक्याची आहे. पंतच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएलमध्ये अनेक उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्याचे किंमत आणखी वाढली आहे. अशा स्थितीत पंत लिलावात सर्वात महागडा खेळाडू बनून इतिहास रचू शकतो, असे मानले जात आहे.
हे विकेटकिपर मालामाल होणार
-शाई होप - वेस्ट इंडिज - 125 लाख रु
-जोश इंग्लिस - ऑस्ट्रेलिया - 2 कोटी रु
-यान रिकेल्टन - दक्षिण आफ्रिका - एक कोटी रु
-आर्यन जुयाल - भारत - 30 लाख रुपये
-कुमार कुशाग्र - भारत - 30 लाख रुपये
-रॉबिन मिन्झ - भारत - 30 लाख रु
-अनुज रावत - भारत - 30 लाख रुपये
-लवनीथ सिसोदिया - भारत - 30 लाख रुपये
-विष्णू विनोद - भारत - 30 लाख रुपये
-सॅम बिलिंग्ज - इंग्लंड - 1.5 कोटी
-जॉर्डन कॉक्स - इंग्लंड - 1.25 कोटी
-बेन मॅकडरमॉट - ऑस्ट्रेलिया - 75 लाख
-कुसल मेंडिस- श्रीलंका - 75 लाख
-कुसल परेरा - श्रीलंका- 75 लाख
-जोश फिलिप - ऑस्ट्रेलिया- 75 लाख
-टिम सेफर्ट - न्यूझीलंड - 75 लाख रुपये
- लिटन दास - बांगलादेश - 75 लाख
-आंद्रे फ्लेचर - वेस्ट इंडिज - 75 लाख
-टॉम लॅथम - न्यूझीलंड - 1.5 कोटी रु
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications