'प्रसिद्धी भारतात अन् नवरा पाकिस्तानाचा केला'; कुमार विश्वास यांनी उडवली सानिया मिर्झाची खिल्ली

Kumar Vishwas on Sania Mirza : आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या मुलाच्या नावाबाबत काही विधाने केली होती. कुमार विश्वास यांनी एका कवी संमेलनाच्या मंचावरून काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सैफच्या मोठ्या मुलाचे नाव विदेशी आक्रमक तैमूरच्या नावावर ठेवण्याबाबत कुमार विश्वास यांनी टोला लगावला. ते म्हणाले होते की भारताला लुटणाऱ्या आणि माता-मुलींवर बलात्कार करणाऱ्या आक्रमणकर्त्याचेच नाव त्यांना का सापडले? दुसरे कोणतेही नाव वापरता आले असते, अनेक नावे होती ना.

Kumar Vishwas on Sania Mirza

कुमार विश्वास यांनी असे विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाबाबतही वादग्रस्त विधान केले होते. जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सानियाच्या शोएब मलिकसोबतच्या लग्नानंतरचा आहे.

सानिया मिर्झावर काय म्हणाले कुमार विश्वास?

2010 मध्ये सानियाच्या लग्नानंतर कुमार विश्वास यांनी 2011 मध्ये सांगितले की, गेल्या वर्षी आमची टेनिसपटू सानिया मिर्झाचे लग्न झाले. सानियाच्या लग्नाला माझा आक्षेप नाही, पण सानियाने भारतातून तिचे नाव आणि प्रसिद्धी ('फेम') मिळवली आणि तिचा नवरा ('शोहर') पाकिस्तानातून निवडला यावर माझा आक्षेप आहे. मी तिला एसएमएसही पाठवला की, तुम्हाला 'हिटर' हवा असेल तर आमच्याकडे युसूफ पठाण भारतात आहे, मग तुम्ही इतक्या दूर का जात आहात.

सानिया मिर्झाचा घटस्फोट झाला

विशेष बाब म्हणजे हा व्हायरल व्हिडिओ 2011 मधील आहे. सानिया आणि शोएबचे लग्न एप्रिल 2010 मध्ये झाले होते. हे लग्न एका दशकाहून अधिक काळ चालल्यानंतर संपुष्टात आले. 2023 मध्ये सानिया आणि शोएबने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. खरं तर, सानियाने शोएबला सोडलं कारण त्याचं दुस-यासोबत अफेअर होतं.

सानिया निघून जाताच शोएबने पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. शोएब त्याच्या तिसऱ्या पत्नीसोबत दुबईत राहतो. दुसरीकडे सानियाही तिच्या मुलासोबत दुबईत राहते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+