Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या
Kuldeep yadav wedding date : मैदानावर आपल्या फिरकीने भल्याभल्या फलंदाजांना नाचवणारा कुलदीप यादव आता स्वतः लग्नाच्या मांडवात नाचण्यासाठी तयार आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्याचा आनंद अद्याप ओसरलेला नसतानाच कुलदीपच्या लग्नाची तारीख समोर आल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, या शाही विवाहसोहळ्याला क्रिकेट विश्वातील दिग्गज 'जय-वीरू' म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा 'चायनामन' गोलंदाज कुलदीप यादवसाठी २०२६ हे वर्ष खऱ्या अर्थाने लकी ठरले आहे. अहमदाबादमध्ये टी-२० वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावल्यानंतर आता कुलदीप आयुष्यातील सर्वात महत्त्वाची इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. कुलदीप यादव येत्या १४ मार्च २०२६ रोजी आपली बालमैत्रीण वंशिका हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

कोण आहे कुलदीपची होणारी पत्नी वंशिका?
कुलदीपची होणारी पत्नी वंशिका ही कानपूरच्या श्याम नगरची रहिवासी आहे. कुलदीप आणि वंशिका हे बालपणीचे मित्र असून त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. वंशिका सध्या भारतीय जीवन विमा निगम (LIC) मध्ये कार्यरत आहे. या जोडीचा साखरपुडा ४ जून २०२५ रोजी लखनौमधील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडला होता.
लग्नाचे वेळापत्रक आणि ठिकाण
१३ मार्च: उत्तराखंडमधील मसूरी येथील निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडेल.
१४ मार्च: मसूरीमध्येच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाहसोहळा संपन्न होईल.
१७ मार्च: लखनौच्या 'सेंट्रम हॉटेल'मध्ये एक भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे, जिथे चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहतील.
कुलदीप यादव: थोडक्यात पण खास कामगिरी
- कुलदीप यादव हा भारताचा सर्वात यशस्वी फिरकीपटूंपैकी एक मानला जातो.
- विक्रमी कामगिरी: त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून आतापर्यंत ३६५ बळी (Wickets) घेतले आहेत.
- वर्ल्ड कपमधील चमक: नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने १४ धावांत १ बळी घेत महत्त्वपूर्ण स्पेल टाकला होता.
- IPL चा स्टार: आयपीएल २०२६ मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार असून संघाने त्याला १३.२५ कोटी रुपयांना रिटेन केले आहे.












Click it and Unblock the Notifications