केएल राहुलने सासरे सुनील शेट्टीसोबत केली गुंतवणूक, ठाण्यात घेतली 7 एकर जमीन, किती पैसे मोजले?
KL Rahul-Sunil Shetty News : क्रिकेटर केएल राहुल आणि त्यांचे सासरे बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांनी सात एकर जमीन खरेदी केली. ठाणे शहरापासून काही अंतरावर असलेल्या भागातच त्यांनी जमीन खरेदी केली आहे.

कुठे आहे ही जमीन?
मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी व त्यांचे जावई तथा क्रिकेटपटू केएल राहुल यांच्यासोबत 7 एकर जमीन खरेदी केली आहे, ज्याची किंमत 9.85 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
स्क्वेअर यार्ड्सने नोंदणी महानिरीक्षकांकडे केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीदरम्यान ही माहिती समोर आलेली आहे. या जमिनीसाठी सुनील शेट्टी आणि केएल राहुल यांनी 68.96 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरले. ही जमीन मुंबईतील ठाणे पश्चिममधील ओवाळ परिसरात आहे.
वांद्रे परिसरात घेतला होता प्लॅट
आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्यावर्षीच केएल राहुल आणि त्यांची पत्नी आथिया शेट्टी यांनी गेल्या वर्षी वांद्रेच्या पाली हिलच्या सँडहू पॅलेस येथे 3,350 चौरस फूट लक्झरी अपार्टमेंट विकत घेतले होते. जे सुमारे 20 कोटींपेक्षा जास्त किमतीचे असल्याचे सांगितले गेले. या घरासाठी केएल राहुलला 1.20 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क द्यावे लागले.
काही महिन्यांपूर्वीच केएल बाबा बनला!
भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल काही महिन्यांपूर्वीच बाबा झाला आहे. त्यांची पत्नी अथिया शेट्टी यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. राहुल आणि अथिया यांनी इंस्टाग्रामद्वारे पहिल्यांदाच पालक झाल्याची माहिती दिली होती.
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय केएल राहुल
दुसरीकडे, आयपीएल 2025 मध्ये केएल राहुल सद्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. दिल्ली टीमसाठी तो सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू देखील आहे. सद्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सची स्थिती मजबूत आहे.












Click it and Unblock the Notifications