Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

55 चेंडूत 141 धावा; अभिषेकने रचला 'हा' विक्रम, संघाच्या मालकिनीने तर मिठीच मारली, पहा व्हिडीओ

आयपीएल- २०२५ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज (पीबीकेएस) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) यांच्यात सामना झाला. पंजाबच्या २४६ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या अभिषेक शर्माने ५५ चेंडूत १४१ धावा फटकावल्या. आयपीएलमधील ही तिसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. तर भारतीय खेळाडूने केलेल्या सर्वोच्च धावा ठरल्या. या खेळीत अभिषेकने १० षटकार आणि १४ चौकार ठोकले.

Kavya Maran video

आधी रागावली आता...

एका आठवड्यापूर्वी अभिषेक शर्मा पहिल्या षटकात फक्त एका धावेवर धावबाद झाला होता. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादला सलग चौथा पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा फ्रँचायझीची सहमालक काव्या मारन रागावलेली क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. परंतु शनिवारी आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी करत स्टार फलंदाज अभिषेक शर्माने तिच्या चेहऱ्यावर हास्य आणले.

लगावले खणखणीत १० षटकार

या खेळीत अभिषेकने १० षटकार आणि १४ चौकारांसह त्याचे पहिले आयपीएल शतक पूर्ण केले. लीगच्या इतिहासात भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी क्रिस गेलने नाबाद १७५ धावा तर २००८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी ब्रेंडन मॅक्युलमने नाबाद १५८ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासात ही तिसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.

काव्याने मारली मिठी

अभिषेकने ४० चेंडूत शतक केल्यानंतर काव्या मारनने आनंदाने जागेवरून उड्या मारून आनंद साजरा केला. त्यानंतर तिने अभिषेकचे आई-वडील जेथे मॅच पाहत होते तेथे जात त्याच्या आईला थेट मिठीच मारली. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील स्टँडमध्ये काव्याचा हा आनंद चर्चेचा विषय ठरला. अभिषेकने त्यानंतर अवघ्या १५ चेंडूत ४१ धावा झोडपल्या.

युवराज, सूर्याचे आभार

अभिषेकने हंगामाची सुरुवात कठीण केली. पहिल्या पाच सामन्यांमध्ये तो फक्त ५१ धावा करता आल्या. या कठीण काळात साथ दिल्याबद्दल त्याने मार्गदर्शक युवराज सिंग आणि भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे आभार मानले. सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर तो म्हणाला की, "युवीचा विशेष उल्लेख मला करावासा वाटतो. मी त्याच्याशी बोलत आहे. सूर्यकुमार यादवचेही मी आभार मानतो."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+