इंग्लंडविरुद्ध कसोटीत अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग-11
भारतीय कसोटी संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार असून, त्याआधीच संभाव्य प्लेइंग-11बाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. 5 जून रोजी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कसोटी संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांनी एकत्र माध्यमांसमोर येत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते म्हणजे करुण नायरला संघात संधी देण्याचे सूचक विधान.

गौतम गंभीरचा नायरला ठाम पाठिंबा
गंभीरने स्पष्टपणे सांगितले की, जे खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत त्यांना संधी देणे गरजेचे आहे. "फक्त एखाद्या कसोटीत अपयश आल्यावर आपण निर्णय घेऊ नये. जे खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेहनत घेत आहेत, त्यांना डावलता येणार नाही," असं म्हणत गंभीरने करुण नायरच्या निवडीसाठी मजबूत संकेत दिले.
करुण नायरच्या पुनरागमनाची कथा
करुण नायरसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट एक roller coaster प्रवास ठरला आहे. 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तिहेरी शतक ठोकणारा हा फलंदाज काही महिन्यांतच संघातून बाहेर फेकला गेला. त्यानंतर 2017 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत त्याचा फॉर्म घसरला आणि 2018 च्या इंग्लंड दौऱ्यात संधी न मिळाल्याने त्याचं नाव मागे पडलं.
मात्र नायरने हार न मानता देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा केल्या. 2023 च्या काउंटी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर त्याने 2024-25 च्या रणजी हंगामात 863 धावा फटकावत आपली फॉर्म सिद्ध केली. यानंतर त्याने इंडिया A संघाकडून इंग्लंड लायन्सविरुद्ध द्विशतक झळकावत निवडकर्त्यांचे लक्ष वेधले.
20 जूनच्या पहिल्या कसोटीसाठी संभाव्य संघ
पहिली कसोटी 20 जून रोजी हेडिंग्ले (लीड्स) येथे होणार आहे. करुण नायरला यामध्ये स्थान मिळण्याची शक्यता अधिक असल्याचं चित्र आहे. संभाव्य 11 अशी असू शकते -
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
कर्णधार - शुभमन गिल
उपकर्णधार/विकेटकीपर - ऋषभ पंत
फलंदाज - यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी
ऑलराउंडर - रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर
गोलंदाज - जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव
रिजर्व यष्टीरक्षक - ध्रुव जुरेल
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी: 20-24 जून, लीड्स
दुसरी कसोटी: 2-6 जुलै, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी: 10-14 जुलै, लॉर्ड्स
चौथी कसोटी: 23-27 जुलै, मँचेस्टर
पाचवी कसोटी: 31 जुलै-4 ऑगस्ट, ओव्हल












Click it and Unblock the Notifications