Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जोस बटलरने इंग्लंड संघाचे कर्णधारपद सोडले; चॅम्पियन्स ट्रॉफीतील खराब कामगिरी आली पथ्यावर

jos buttler resigns as england white ball captaincy : इंग्लंडच्या जोस बटलरची एकदिवसीय आणि टी-20 स्वरूपातील संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाच्या खराब कामगिरीनंतर बटलरने हा निर्णय घेतला. शनिवारी कराची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गट फेरीच्या सामन्यात तो शेवटच्या वेळी संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याने शुक्रवारी माध्यमांशी बोलताना या गोष्टीचा खुलासा केला.

पत्रकार परिषदेत काय म्हणाला जोस बटलर?

शुक्रवारी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत संबोधित करताना बटलरने कर्णधारपद सोडण्याबद्दल मोठी घोषणा केली. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक आणि 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंड संघ गट टप्प्यातच बाहेर पडला होता. त्यामुळे या कामगिरीमुळे इंग्लंड क्रिकेट असोसिएशन देखील नाराज झालेला आहे.

jos buttler

बटलर म्हणाला - कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ

पत्रकार परिषदेत बोलताना बटलर म्हणाला, 'माझ्यासाठी कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे, संघासाठीही हीच योग्य वेळ आहे.' मला आशा आहे की एक नवीन खेळाडू संघाची धुरा सांभाळेल आणि प्रशिक्षक मॅक्युलमसोबत संघाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. माझ्या कर्णधारपदासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचे निकाल खूप महत्त्वाचे होते.

जेव्हा मॅक्युलम व्हाईट बॉल प्रशिक्षक झाला, तेव्हा मी त्याच्यासोबत काम करण्यास खूप उत्सुक होतो. मला आशा होती की संघ त्यांचे निकाल बदलेल आणि वेगाने पुढे जाईल. तथापि, ते होऊ शकले नाही, म्हणून मी कर्णधारपद सोडत आहे.

खेळावर खूप काम करण्याची गरज आहे- बटलरचा विश्वास

अफगाणिस्तानविरुद्धचा सामना गमावल्यानंतर जोस बटलर म्हणाला, 'मला वाटते की संघाला आम्हाला हवे असलेले निकाल मिळाले नाहीत. म्हणून, मला कर्णधारपदाच्या माझ्या निर्णयावर पुनर्विचार करावा लागला. इंग्लंड क्रिकेटला दोन्ही व्हाईट बॉलच्या स्वरूपात खूप विचार करण्याची गरज आहे. मला माझ्या खेळावर खूप मेहनत घ्यावी लागेल. मला हे समजून घ्यावे लागेल की मी समस्येचा भाग आहे की उपाय करण्याचा भाग. त्यामुळे हा मी मोठा निर्णय घेतला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+