वर्ल्ड कप फायनलपूर्वी जेमिमा रोड्रिग्जचं 'झुंजार' भाषण; टीम इंडियात भरलं बळ, पाहा-खास VIDEO
Jemimah Rodrigues Inspiring Speech Before World Cup Final 2025 : महिला क्रिकेट विश्वचषकाच्या मेगाफायनलपूर्वी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचं वातावरण आहे. उद्या, २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्डकपची अंतिम लढत होणार आहे.
या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी, उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवून देणारी झुंजार फलंदाज जेमिमा रोड्रिग्ज हिचं ड्रेसिंग रुममधील प्रेरणादायी भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने टीम इंडियात १०० हत्तीचं बळ भरल्याचं दिसत आहे!

ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय
भारतीय संघाने उपांत्य फेरीत सात वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात विक्रमी धावांचा पाठलाग करताना जेमिमा रोड्रिग्जने अविस्मरणीय शतक झळकावले. या विजयानंतर जेमिमा अत्यंत भावूक झाली होती; मैदानावर तसेच 'सामनावीर' पुरस्कार स्वीकारतानाही तिला अश्रू अनावर झाले होते. फॉर्मबद्दलची चिंता आणि संघातून वगळण्याच्या चर्चांवरही तिने पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले होते.
Player of the match ✅
— BCCI Women (@BCCIWomen) October 31, 2025
Fielder of the match ✅
🎥 𝐃𝐫𝐞𝐬𝐬𝐢𝐧𝐠 𝐫𝐨𝐨𝐦 𝐁𝐓𝐒 𝐰𝐢𝐭𝐡 𝐉𝐞𝐦𝐢𝐦𝐚𝐡 𝐑𝐨𝐝𝐫𝐢𝐠𝐮𝐞𝐬 celebrating unseen moments and team spirit 💙
Get your #CWC25 tickets 🎟 now: https://t.co/vGzkkgwXt4 #WomenInBlue | #INDvAUS | @JemiRodrigues pic.twitter.com/9cDzPl2nKQ
बीसीसीआयने शेअर केला 'तो' खास व्हिडिओ!
बीसीसीआयने नुकताच भारतीय महिला संघाच्या ड्रेसिंग रूममधील एक विशेष व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मुनीश बाली यांनी प्रथम संघाला संबोधित केले, त्यानंतर जेमिमा रोड्रिग्जने आपले मनोगत व्यक्त केले.
प्रशिक्षकांकडून कौतुक
प्रशिक्षक मुनीश बाली यांनी रेणुका ठाकूरचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण (ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० वेळा चेंडू थांबवला) आणि श्री चरणीची अप्रतिम झेल व गोलंदाजीचे विशेष कौतुक केले. तसेच, क्रांती गौडने मैदानात मारलेल्या डाईव्हबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.
जेमिमाला सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचं पदक
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जेमिमाने केवळ फलंदाजीतच नव्हे, तर धावबाद आणि एका शानदार झेलमुळे तिला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देण्यात आला.
ड्रेसिंग रूममध्ये जेमिमा काय म्हणाली?
सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचे पदक स्वीकारल्यानंतर जेमिमाने आपल्या खेळीतील आणि संघातील महत्त्वाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तिच्या बोलण्यातून संघभावना आणि विजयाची तीव्र भूक स्पष्टपणे जाणवत होती.
दीप्ती शर्माचा आधार
जेमिमा म्हणाली, "जेव्हा मी ८५ धावांवर पोहोचले, तेव्हा मी खूप थकले होते. संघातील खेळाडू मैदानावर येत राहिले आणि मला पाणी देत राहिले." तिने दीप्ती शर्माचा उल्लेख करत सांगितले, "मी दीप्तीला माझ्याशी बोलत राहण्यास सांगितले. त्यानंतर ती सतत मला प्रेरणा देत राहिली. ती धाव घेण्यासाठी तिच्या विकेटचा त्यागही करत होती आणि ती जाताना म्हणाली, 'काही हरकत नाही, फक्त सामना संपव.' "
लहान खेळींचे महत्त्व
तिने स्पष्ट केले की, अनेकदा मोठ्या आणि विशेष डावांबद्दल बोलले जाते, परंतु दीप्ती शर्मा, रिचा घोष आणि अमनजोत कौर यांच्यासारख्या खेळाडूंच्या लहान खेळी आणि भागीदारीशिवाय ते अशक्य आहे. तिने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबतच्या भागीदारीचाही गौरव केला.
मानसिकतेतील बदल
जेमिमाच्या मते, पूर्वी भारतीय संघात 'एक विकेट गमावली की सामना गमावतो' अशी मानसिकता होती, पण आता या संघाने ती मानसिकता बदलली आहे.
व्हिडिओच्या शेवटी, जेमिमाने विजयी आवेशात म्हटले, "आता आपण पुरेसं केलं आहे, फक्त एक...!" हा 'एक' म्हणजे पहिल्या विश्वचषक विजेतेपदाचा अंतिम सामना जिंकण्याचा तिचा आणि संपूर्ण टीमचा निर्धार होता.
विश्वचषक जिंकण्याची ऐतिहासिक संधी!
भारतीय महिला संघ यापूर्वी २००५ आणि २०१७ मध्ये एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये पोहोचला आहे, पण त्यांना एकदाही ट्रॉफी जिंकता आली नाही. उद्याचा (२ नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना हा भारतीय संघासाठी पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
जेमिमा रोड्रिग्जच्या या भावनिक आणि प्रेरणादायी भाषणाने संघाला अंतिम लढतीसाठी नवी ऊर्जा दिली असून, कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या आशा या 'झुंजार' महिलांवर खिळल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications