जय शाह यांची ICC अध्यक्षपदी बिनविरोध निवड, सर्वात तरुण अध्यक्ष बनून इतिहास रचला
Jay Shah New ICC Chairman: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह आता जागतिक क्रिकेटचे अध्यक्ष बनले आहेत. आयसीसी अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी बिनविरोध जिंकली आहे. जय शाह आता आयसीसीचे नवे अध्यक्ष झाले आहेत. आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या निर्णयानंतर हे पद रिक्त झाले. बार्कलेचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला पूर्ण होणार आहे. जय शहा 1 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारतील.
सर्वात तरुण बनले अध्यक्ष
आयसीसी अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट होती. जय शहा यांनी अर्ज दाखल केला होता . त्यांच्या विरुध्द कोणीही निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यांनी ही निवडणूक बिनविरोध जिंकली. वयाच्या 35 व्या वर्षी ते आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष झाले आहेत.

काय म्हणाले जय शाह
जय शाह ऑक्टोबर 2019 पासून बीसीसीआयचे सचिव आणि जानेवारी 2021 पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांच्या निवडीनंतर जय शाह यांनी क्रिकेटची जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी आणि लोकप्रियता वाढवण्याचा मानस व्यक्त केला. ते म्हणाले, "आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नामांकन मिळाल्याचा मला सन्मान वाटतो.
Jay Shah has been elected unopposed as the next Independent Chair of the ICC.https://t.co/Len6DO9xlE
— ICC (@ICC) August 27, 2024
क्रिकेटचे जागतिकीकरण करण्यासाठी मी आयसीसी संघ आणि आमच्या सदस्य देशांसोबत काम करण्यास वचनबद्ध आहे. क्रिकेटला पूर्वीपेक्षा अधिक सर्वसमावेशक आणि लोकप्रिय बनवण्याचा आमचा उद्देश आहे.












Click it and Unblock the Notifications