Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारतीय क्रिकेटमध्ये दुःखाचे वातावरण! या क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; CCTV व्हिडिओ पाहून हृदय हळहळेल

Jammu and Kashmir's 23 year old cricketer Fareed Hussain dies in road accident : भारतीय क्रिकेटमध्ये एका क्षणात दुःखाचे वातावरण पसरले आहे. जम्मू-काश्मीरमधील एका उदयोन्मुख क्रिकेटपटूचे रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या २३ वर्षांच्या या खेळाडूच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर आणि स्थानिक क्रिकेट वर्तुळावर मोठा आघात झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत असून, ते पाहून सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.

Jammu and Kashmir s 23-year-old cricketer Fareed Hussain dies

जम्मू काश्मीरचा 23 वर्षीय क्रिकेटर फरीद हुसेन याचा रस्त्या अपघातात मृत्यू झाला आहे, जम्मू आणि काश्मीर येथील हा खेळाडू एका व्यक्तीच्या चुकीमुळे आपला जीव गमावून बसला. प्राप्त माहितीनुसार आणि वन इंडिया इंडीने दिलेल्या वृत्तानुसार 20 ऑगस्ट रोजी ही घटना घडली त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर येत आहे हे सीसीटीव्ही फुटेज चा व्हिडिओ सोशल मीडियावर गतीने व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत

कसा घडला अपघात?

२० ऑगस्ट रोजी ही दुर्दैवी घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, फरीद हा आपल्या दुचाकीवरून शोपियां जिल्ह्यातून जात होता. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारचा दरवाजा आतील व्यक्तीने अचानक उघडला. नेमका त्याच वेळी फरीद तिथून जात होता. दरवाज्याचा धक्का बसल्यामुळे तो दुचाकीवरून खाली पडला आणि दुर्दैवाने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, फरीदने हेल्मेट घातले नव्हते. खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जीव वाचवता आला नाही. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

क्रिकेटचा भविष्यातील तारा निखळला

अवघ्या २३ वर्षांचा फरीद हुसेन जम्मू-काश्मीरमधील क्रिकेटचा एक उगवता तारा मानला जात होता. त्याचे सहकारी आणि प्रशिक्षक सांगतात की, तो क्रिकेटसाठी समर्पित होता आणि त्याच्यात एक उत्तम खेळाडू बनण्याची क्षमता होती. त्याचे भविष्य उज्ज्वल होते, परंतु एका क्षणात हा प्रतिभाशाली खेळाडू काळाच्या पडद्याआड गेला. त्याच्या अकाली निधनाने स्थानिक क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+